Gold Price नवी दिल्ली: भारतातमधील सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2025 हे वर्ष फायदेशीर ठरलं आहे. सोन्याच्या दरात 73- 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा 1 जानेवारी 2025 चा दर प्रति 10 ग्रॅम 78 हजार रुपये इतका होता डिसेंबर महिन्यात सोन्याचा एका तोळ्याचा दर 137000 रुपये आहे. गेल्या 46 वर्षातील ही सर्वात मोठी वाढ आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने दरानं 135590 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत सोन्याचा एका तोळ्यचा दर 134200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य देत आहेत. ऑक्टोबर 2023 पासून सोन्याचे दर 139 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याप्रमाणं चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
पुढील वर्षी सोन्याचे दर वाढणार?
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी 2026 मध्ये देखील पाहायला मिळू शकते. बाजार जाणकारांच्या मते सोने आणि चांदी गेल्या 10 वर्षात रिटर्न देण्यामध्ये सर्वात पुढे आहेत.
मेहता इक्विटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष कमोडिटीज राहुल कलांत्री यांनी दरातील तेजी आणि घसरणीनंतर देखील गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर दोन महिन्यातील उच्चांकाजवळ आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरातील 25 बेसिस पॉईंटच्या कपातीनंतर जागतिक मार्केटमध्ये चांदीच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 100 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
गुंतवणूकदारांबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?
गुंतवणूकदारांसाठी त्यांची रणनीती सांगताना रामास्वामी म्हणाले की किमतीमधील कोणतीही संभाव्य घसरण लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी हळू हळू खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जर, सोन्याचे दर ठराविक रकमेवर कायम राहिले तर ते ऑक्टोबरच्या उच्चांकाला गाठू शकतात.
मॅक्सवेलनं मत मांडलं की गुंतवणूकदारांची रणनीती संतुलित असली पाहिजे. ज्या लोकांनी कमी दरांवर गुंतवणूक केली होत. त्यांनी कोअर अलॉकेशन कायम ठेवत अंशत: नफा बुक करण्याबाबत विचार करावा. यासाठी कारण सांगण्यात आलं असून ते वोलॅटिलिटी आणि मॅक्रोइकोनॉमिक धक्क्यांशिवाय हेजच्या रुपात काम करते. नव्या गुंतवणूकदारांनी घसरण पाहता डॉलर कॉस्ट एवरेजिंग स्ट्रॅटेजी राबवावी, असं त्यांनी म्हटलं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)