Prithviraj Chavan: एपस्टीन फाईल्समध्ये जी माहिती आपल्यासमोर आली आहे, त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेल मध्ये आहे. हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे राजदूत होते, त्यांचे नाव अनेक वेळेला आलं आहे, पाच-सहा वेळेला त्याच्या भेटीघाटी झाल्या असं काहीतरी उल्लेख आला आहे. माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव आहे. अमेरिकेत राहणारे आरोग्य विषयक एक बडी व्यक्ती आहेत, भारतीय वंशाच्या, त्यांचेही नाव आहे. ट्रम्प यांचा सल्लागार स्टीव बॅननने एपस्टीनला विनंती केली होती की मला पंतप्रधानांना भेटायचंय. एपस्टीनकडून उत्तर आले की तो प्रयत्न करतोय, आणि नंतर काही दिवसांनी पुन्हा ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड. मोदींच आणि एपस्टीनच काय नातं आहे की जो एपस्टीन मोदींची कुणाशीही अपॉईटमेंट घडवू शकतो याच उत्तर सरकारकडून मिळायला हवं, असा असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
भारत सरकारकडून खुलासा होत नाही
ते म्हणाले की, प्रकरण गंभीर असून सुद्धा सरकार खुलासा केला जात नाही. भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही थोडीशी चिंतेचा विषय आहे. त्यांनी सांगितले की, मी एक डिसेंबरला संवाद साधताना मी असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का असा मी प्रश्न विचारला होता. भारताच्या राजकारणावर त्याचा अमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतील. जी भीती होती की यामध्ये काही उच्च पदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागली आहे. पंतप्रधानांचं अशा पद्धतीने नाव समोर येणं हे भारताच्या दृष्टीने प्रतिमा मलीन करणार आहे का? जर बाल लैंगिक शोषण झालेलं सिद्ध झालं किंवा त्याचा पुरावा समोर आला, तर तो अमेरिकेत गुन्हा ठरतो आणि भारतात देखील शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे असे ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 मोठे दावे
- सध्या हा 300 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त डेटा आहे. लक्षावधी ईमेल्स, फोटोग्राफ आणि व्हिडिओ असतील. जी माहिती आलेली आहे, ती फक्त पार्शल माहिती आली आहे.
- जी माहिती आपल्यासमोर आलेली आहे, त्यामध्ये ईमेल्स मध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेल मध्ये आहे.
- हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे राजदूत होते, त्यांचे नाव अनेक वेळा आलं आहे, पाच-सहा वेळेला त्याच्या भेटीघाटी झाल्या असं काहीतरी उल्लेख आलेला आहे.
- माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव आहे. अमेरिकेत राहणारे आरोग्य विषयक एक बडी व्यक्ती आहेत, भारतीय वंशाच्या, त्यांचेही नाव आहे.
- ट्रम्प यांचा सल्लागार स्टीव बॅनन याने एपस्टीनला विनंती केली होती की मला पंतप्रधानांना भेटायचंय. एपस्टीनकडून उत्तर आले की तो प्रयत्न करतोय, आणि नंतर काही दिवसांनी पुन्हा ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड.
- प्रश्न असा आहे की "मोदींच आणि एपस्टीनच काय नातं आहे की जो एपस्टीन मोदींची कुणाशीही अपॉईटमेंट घडवू शकतो याच उत्तर सरकारकडून मिळावं लागेल".
- भारताच्या राजकारणावर त्याचा अमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते.
- मी चित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतील.
- जर बाल लैंगिक शोषण झालेलं सिद्ध झालं किंवा त्याचा पुरावा समोर आला, तर तो अमेरिकेत गुन्हा ठरतो आणि भारतात देखील शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे.
एपस्टीन हा इस्त्रायली गुप्तहेर होता
त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेत एक प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्स स्कॅडलच्या रूपाने 1995-96 पासून चालू आहे. या घटनेचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन नावाचा जो एक मोठा धनाड्य उद्योगपती होता. त्याने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आणि उच्च पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला. एपस्टीनचा मृत्यू ऑगस्ट 2019 मध्ये झाला, त्याने गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की तो काही बोलू नये म्हणून याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही. एपस्टीन हा इस्त्रायली गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतवून त्यांना ब्लॅकमेल करायचं. त्यामुळे आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं का हे शोधावं लागेल, असे ते म्हणाले.
हा मोठा संघर्ष होणार आहे
ते म्हणाले की, सध्या हा 300 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त डेटा आहे. लक्षावधी ईमेल्स, फोटोग्राफ आणि व्हिडिओ असतील. जी माहिती आलेली आहे, ती फक्त पार्शल माहिती आलेली आहे. अमेरिकन अटर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितले आहे की सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागतील. यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते फोटो थोडे मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. सध्या तिथे सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे. खासदारांचे म्हणणे आहे की बहुतेक राष्ट्रपती माहिती लपवण्याचा प्रयत्न करतील, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल. हा मोठा संघर्ष होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या