Hardik Pandya, Mahika Sharma, Ind vs SA T20: टीम इंडिया (Team India) आणि साऊथ आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळवण्यात आलेला सामना शुक्रवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये (Ind vs SA T20) खेळवण्यात आलेल्या 5 सामन्यांची टी20 सीरिजचा शेवटचा सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) तुफान खेळी खेळली. हार्दिक पांड्यानं मैदानात चौकार, षट्‍कारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्यानं केवळ 16 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हा सामना हार्दिक पांड्यासाठी खास होता. या सामन्यासाठी त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Mahika Sharma) उपस्थित होती. हार्दिकचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर माहिकाची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Continues below advertisement

हार्दिकच्या अर्धशतकानंतर माहिकाचं सेलिब्रेशन 

हार्दिक पंड्यानं अर्धशतकी खेळीनंतर ज्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा देखील हार्दिकच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसली. हार्दिकनं मैदानातून सेलिब्रेशन केलं, तर माहिका स्टे डियममधून सेलिब्रेशन करत होती. पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतर हार्दिकनं बॅटवर करून सेलिब्रेशन केलं. त्यानंतर माहिकाकडे पाहून त्यानं तिला फ्लाइंग किस दिले.

हार्दिकच्या सेलिब्रेशननंतर माहिका खूप आनंदी दिसली आणि तिनंही हार्दिकला फ्लाईंग किस दिले. हार्दिक पांड्यानं मैदानात कहर केलाच, पण त्यासोबत त्याचं आणि गर्लफ्रेंडचं सेलीब्रेशन पाहून सोशल मिडिया युजर्सही कमेंट्सचा पाऊस पाडू लागले. 

हार्दिक पांड्या, तिलक वर्माची दमदार खेळी 

साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी दमदार खेळी खेळली. टीम इंडियानं 20 ओव्हर्समध्ये 231 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात हार्दिक पांड्यानं 25 चेंडूंत 63 धावा केल्या. यादरम्यान, त्यानं 5 चौकार आणि 5 षट्कार लगावले. 

हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड 

नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात माहिकाची एन्ट्री झाली. दोघांनी नुकताच गुपचूप साखरपुडाही केलाय. 24 वर्षांची माहिका सुप्रसिद्ध मॉडेल आहे.  हार्दिक पांड्या आणि माहिका एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. माहिका हार्दिक पांड्यापेक्षा जवळपास आठ वर्षांनी लहान आहे. पांड्याचा जन्म 8 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातमधील चोरयासी इथे झालेला. तो सध्या 32 वर्षांचा आहे, तर माहिका 24 वर्षांची आहे. माहिका शर्मा मूळची दिल्लीची आहे. तिचं मॉडलिंग जगतात मोठं नाव आहे. माहिकानं इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये डिग्री घेतलीय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pakistani Girl Looks Like Anushka Sharma: 'अरे, ही तर वहिनीपेक्षा जास्त क्युट...'; सेम टू सेम अनुष्का शर्मासारखी दिसतेय 'ती' पाकिस्तानी तरुणी; Video पाहून विराट कोहलीचे फॅन्स हैराण