मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी (Gold And Silver Rate Today) या मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने वाढ होताने दिसत आहे. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडी तसेच देशातील स्थितीमुळे सोने-चांदी दिवसेंदिवस महाग होत आहे. असे असताना आता ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात आज (19 ऑक्टोबर) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ही भाववाढ लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव 80 हजारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सोन्याच्या भावात सातत्याने वाढ


गेल्या दोन दिवासांत सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याआधीही सोन्याचा भाव वाढला होता. सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा 79 हजार 400 वर पोहोचला आहे. म्हणजेच सोन्याचा भाव जवळपास 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आगामी काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास सोन्याचा भाव थेट 80 हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही भाववाढ होण्याची अनेक कारणं आहेत. मात्र मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या भावा मोठी वृद्धी होताना दिसत आहे.


सोन्याचा भाव वाढण्याचे कारण काय?


सध्य मध्य पूर्वेत, आखाती प्रदेशात तणावाचे वातावरण आहे. इस्रायल-इराण यांच्यात युद्धजन्य स्थिती आहे. दुसरीकडे इस्रायलचा हमासविरोधातील लढा आणखीनच तीव्र झालेला आहे. त्यामुळे या परिस्थितीचा फटका समस्त जगाला बसत आहे. भविष्यातही अशीच स्थिती राहिल्यास कच्च्या इंधनाचा दर भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सोने आणि चांदी यासारखे मौल्यवान धातूदेखील महाग होऊ शकतात. याच स्थितीचा काहीसा परिणाम सध्या दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचा दर सातत्याने वाढतोय. सध्या हा दर 79 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. भविष्यात हा दर थेट 80 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 


सोने-चांदीचा दर कोण ठरवतं?


गेल्या अनेक वर्षांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली आहे. 1 एप्रिल 2014 रोजी सोन्याचा भाव हा 1300 डॉलर्स प्रतिऔस होता. 1 एप्रिल 2024 रोजी सोने 2260 डॉलर्स प्रतिऔस झाले. म्हणजेच गेल्या काही वर्षांत सोन्याच्य दरात वाढ होत आलेली आहे. सोने-चांदीचा दर आयबीजेए द्वारे ठरवला जातो. या दरावर जीएसटी आणि घडणावळीचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळेच तुमच्या शहरात सोन्याचा दर हा 1000 ते 2000 रुपयांनी कमी-अधिक असू शकतो. 


हेही वाचा :


Solapur Crime : खोटे सोने आणि कागदपत्रं देऊन कॅनरा बँकेची 86 लाखांची फसवणूक, सोलापुरातील प्रकार


Gold Rate : सोनं रोजच खातंय भाव! पण का? सोन्याचा दर कसा ठरवतात? समजून घ्या सोप्या शब्दांत!


सोन्याचा दर ठरवण्यासाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर...