Gold prices hike : अक्षय्य तृतीयेचा सण जवळ आला आहे. अशावेळी प्रत्येकजण सोने-चांदी खरेदी करतात. मागच्या दोन महिन्यांपासून आपण पाहात होतो की, रशिया -युक्रेन तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. या युद्धाचा जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला. एकीकडे रशिया-युक्रेनमधील युद्ध तर दुसरीकडे कोरोना महामारीचे सावट अशा दुहेरी परिस्थितीत सोन्या-चांदीचे दर मात्र गगनाला भिडले. 

  


रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात तर वाढ झालीच. पण, त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल, कच्चं तेल यांचेही दर वाढले. खरंतर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे चलनवाढ, महागाई फार वाढली आहे. सध्या, यूएस सीपीआय सुमारे 8.5% आहे. जागतिक युद्ध असेच सुरु राहिले तर सोन्याच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या वित्तीय सेवा कंपनीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.    


या अहवालानुसार, 2022 वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भारतात सोन्याची मागणी 18 टक्के घसरून 135.5 टन झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक जानेवारीत 64.4 वरून मार्चमध्ये 71.7 पर्यंत वाढला. सोन्याच्या दरातील अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी कमी झाली. 


मागच्या 10 वर्षांची जर आजच्या धातूशी तुलना केल्यास मे 2010 मध्ये सोन्याची किंमत 15,000 होती. तर मे 2012 मध्ये ही किंमत साधारण 30,000 झाली. तर तीच किंमत मे 2022 मध्ये 55,000 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे अर्थात ग्राहकांची सोने खरेदी करण्यासाठीची पसंती कमी झालेली आहे. 


जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर : 


जवळपास विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर स्पॉट गोल्ड वर $1900 च्या आसपास व्यवहार करत होते. तर COMEX वर, चांदीच्या किमती $26.45 आणि $27.15 वर वाढण्याची अपेक्षा आहे. 


आजचे सोन्या -चांदीचे दर : 


गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,790 रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 63,500 रूपयांवर व्यवहार करत आहे.


महत्वाच्या बातम्या :