Gold Silver Rate : सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत होती. आता MCX वर सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आज सोन्याच्या दरात 180 रुपयांची घसरण झालीय. सध्या सोनं 70,800 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.


MCX वर चांदीच्या दरातही 300 रुपयांची घसरण 


दरम्यान, एकीकडं सोन्याच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडं चांदीच्या दरातही घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. MCX वर चांदीच्या दरातही 300 रुपयांची घसरण झालीय. सध्या चांदीचे दर हे 80,260 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्यानं 73 हजार रुपयांची पातळी गाठली होती. आता मात्र, यामध्ये गसरण होऊन सोनं 71000 रुपयांचा आसपास आहे. बुधुवारी बाजारात सोनं 71,050 रुपये होतं. आज यामध्ये 180 रुपयांची घसरण झालीय. सध्या सोनं 70,800 रुपये प्रति तोळा आहे. 


प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर काय?


दिल्लीत -  24 कॅरेट सोने - 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम,  चांदी 82,500 रुपये प्रति किलो 
कोलकाता - 24 कॅरेट सोने -  72,270 रुपये, चांदी 82,500 रुपये प्रति किलो 
चेन्नई - 24 कॅरेट सोने -  73,200 रुपये, चांदी 86,000 रुपये 
मुंबई - 24 कॅरेट सोने - 72,270 रुपये, चांदी - 82,500 रुपये 
पुणे - 24 कॅरेट सोने - 72,270 रुपये, चांदी 82,500 रुपये 
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 72,420 रुपय, चांदी - 82,500 रुपये 
नोएडा - 24 कॅरेट सोने - 72,420 रुपये, चांदी 82,500 रुपये 
लखनौ - 24 कॅरेट सोने - 72,420 रुपये, चांदी - 82,500 रुपये 
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,420 रुपये, चांदी 82,500 रुपये प्रति किलो 
पाटणा - 24 कॅरेट सोने 72,320 रुपये, चांदी-82,500 रुपये प्रति किलो 


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ


दरम्यान, एका बाजूला देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीचे दर वाढत आहेत, तसेच दुसऱ्या बाजूलाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झालीय. चांदी देखील स्वस्त झाली आहे. दरम्यान, अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. याकाळात सोन्याच्या दरात झालेली घसरण सर्वसामान्यांच्या फायद्याची ठरत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता निर्माण केली आहे. दरम्यान, या वाढत्या दरात अनेक नागरिक सोन्याची खरेदी करत आहेत. कारण, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करणं शक्य होणार नव्हतं. मात्र, आता दरात घसरण झालीय.  


महत्वाच्या बातम्या:


सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, दरात झाली घसरण, जाणून घ्या नवीन दर काय?