Garlic Price : लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लसणाच्या दरात (Garlic Price) मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. नांदेडमध्ये (Nanded) जुन्या गावरान लसणाला प्रतिकिलो 600 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळं लसूण आता काजू, बदामापेक्षाही महाग झाल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. 


सध्या लसणाच्या दरात  (Garlic Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. लसणाचा दर हा 600 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, एकीकडं सर्वसामान्यांना जरी लसूण महाग झाला असेल तरी ज्या शेतकऱ्यांकडे (Farmers) लसूण आहे, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे.  


नवीन लसणाचा दर 300 रुपयापासून सुरु


रोजच्या जेवणातील लसणाच्या बाजारभावाने यंदा विक्रम गाठला आहे. नांदेडमध्ये जुन्या गावरान लसुनाला प्रतिकिलो 600 रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळं लसूण काजू बादामपेक्षाही महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी पावसाळ्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळं लसणाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळं लसूण सध्या भाव खातोय. आता नवीन लसूण बाजारात आला आहे, मात्र तरीही लसणाचे भाव काही कमी झालेले नाहीत. त्यातच आगामी लग्नसराईत लसूण आणखीन महाग होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता नवीन लसूण बाजारात आला आहे, त्याचा भाव 300 रुपय किलो पासून सुरु आहे. तर जुना लसूण हा 500 रुपये ते 600 रुपये किलोने विकला जात आहे. 


एकीकडं कांदा-बटाटा स्वस्त, दसरीकडं लसूण महाग


दरम्यान, एकीकडं देशात कांदा-बटाटा यांसारख्या इतर भाज्यांचे भाव कमी झाले असले तरी भाजीपाल्यातील फोडणी मात्र महाग झाली आहे. होय, कोलकाता ते अहमदाबाद एक किलो लसणाचा भाव 450 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशात लसणाच्या दरात झालेली वाढ ही अवघ्या 15 दिवसात झाली आहे. या काळात 200 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लसणाचा भाव 300 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत आले आहेत. आठवडाभरापूर्वी 300 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, कोलकाता येथे 15 दिवसांपूर्वी 200 ते 220 रुपये दराने विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांना विकला जात असल्याची विक्रेत्यांनी दिली आहे. 


दरात का होतेय वाढ?


यावर्षी लसूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं दरात वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. बाजारपेठेतील बहुतांश पुरवठा पश्चिम बंगालच्या बाहेरुन येतो. मुख्यता महाराष्ट्रातील नाशिकहून मोठ्या प्रमाणात लसणाची निर्यात होते. कोलकात्यातच नाही तर गुजरातमधील अहमदाबादमध्येही लसूण 400 ते 500 रुपयापर्यंत किलोनं विकला जात आहे. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशमध्ये लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.


महत्वाच्या बातम्या:


लसणाला मिळतोय 'दराचा तडका', कुठं 400 तर कुठं 500 रुपयांचा दर; सर्वसामान्यांना फटका तर बळीराजाला फायदा