मुंबई : कधी कोणाचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही. सध्या गॅरेजमध्ये काम करणारी एक व्यक्ती थेट कोट्यधीश झाली आहे. या व्यक्तीचे नाव दीपू ओझा असून ते मुळचे बिहार राज्यातील आरा जिल्ह्यातील कोहडा गावेच राहिवासी आहेत. त्यांनी विरंगुळा म्हणून ड्रीम 11 या अॅपवर (Dream 11 App) क्रिकेटची टीम तयार केली आणि त्यात ते तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत. या व्यक्तीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. मुलाला दीड कोटी रुपये मिळाल्यामुळे या व्यक्तीचे आईवडील चांगलेच खुश झाले आहेत.


जिंकले तब्बल दीड कोटी रुपये


ड्रीम 11 अॅपने या व्यक्तीच्या खात्यात दीड कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते या अॅपवर वेगवेगळ्या टीम तयार करायचे. त्यांना क्रिकेट आणि क्रिकेटपटूंविषयी फारशी माहिती नाही. अंदाज बांधून ते ड्रीम 11 वर एक टीम तयार करायचे. यावेळीदेखील त्यांनी अशीच एक टीम तयार केली आणि त्यांना चक्क लॉटरीच लागली. ते थेट दीड कोटी रुपये जिंकले. रविवारी कोलकात नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांत सामना झाला होता. याच सामन्यावेळी दीपू यांनी टीम तयार करताना आंद्रे रसेल यांना कर्णधार केले होते. योगायोगाने या सामन्यात ड्रीम 11 अॅपवर आंद्र रसेललाच सर्वाधिक गुण मिळाले. ज्यामुळे त्याने थेट दीड कोटी रुपये जिंकले 


टीम लावून घरी गेला, अन् नशीब उजळलं


दीप ओझा हे गॅरेजमध्ये काम करतात. रात्री काही काम नसल्यामुळे त्यांनी ही टीम तयार केली होती. त्यांनी ज्या पैशांतून टीम तयार केली होती, त्या पैशाने त्यांना मुलांसाठी दूध आणायचे होते. मात्र त्यांनी दूध आणण्याऐवजी साठ रुपये देऊन टीम तयार केली. त्यानंतर ते घरी गेले. पण घरी गेल्यावर त्यांना समजलं की मी दीड कोटी रुपये जिंकलो आहे. सुरुवातीला त्यांना यावर विश्वासच बसत नव्हता. पण आजूबाजूला, मित्रांना विचारपूस केल्यावर त्यांना मीच दीड कोटी रुपये जिंकलो असल्याचं समजलं. 


याआधीही अनेक करोडपती 


दीपू हे इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले आहेत. आता आई-वडिलांना विचारून जिंकलेल्या पैशांचं काय करायचं, हे ते ठरवणार आहेत. याआधीही अशाच प्रकारे एका युवकाला दीड कोटी रुपये मिळाले होते. आरा जिल्ह्यातील ठकुरी गावातील सौरभ कुमार नावाच्या व्यक्तीने ड्रीम 11 वर पैसे जिंकले होते. 


हेही वाचा :


मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!


इयत्ता 8 वी पास असले तरी थेट नौदलात मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर!


अंबानी, टाटा ते शाहरुख खान, देशातली पाच आलिशान घरं, ज्यांची किंमत वाचून धक्क व्हाल!