अंबानी, टाटा ते शाहरुख खान, देशातली पाच आलिशान घरं, ज्यांची किंमत वाचून धक्क व्हाल!
मुंबई : सामान्यांना श्रीमंत लोकांचे नेहमीच आकर्षण असते. ते कसे राहतात, त्यांचे घर कसे आहे, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. आज आपण भारतातील प्रसिद्ध अशा पाच लोकांची घरे, त्यांची किंमत जाणून घेऊ या. अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे घर दक्षिण मुंबईत आहे. त्यांच्या या घराचे नाव अँटेलिया असे आहे. या घराची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे. या घरात चित्रपटगृह, गॅरेज, स्वीमिंग पूल, स्पा अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हेदेखील मुंबईच्या मलबार हील या भागात राहतात. त्यांच्या घराला जटिया हाऊस म्हणून ओळखले जाते. त्यांच्या घराची किंमत 425 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या घरातही बगीचा, स्वीमिंग पूल, हेलिपॅड अशा सुविधा आहेत.
दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन मुंबईतील जलसा या बंगल्यात राहतात. त्यांच्या घराची किंमत 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा तर अनेक तरुणांचे आकर्षण आहे. त्यांच्या घरात लायब्रेरी, जीम, पर्सनल ऑडिटोरियम अशा सुविधा आहेत. या बंगल्याची अंदाजे किंमत 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
अब्जाधीश रतन टाटा हेदेखील मुंबईत कुलाबा या भागात राहतात. त्यांच्या घराला टाटा हाऊस, टाटा मॅन्शन, कुलाबा हवेली अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्यांच्या घरात जीम, होम थियटर, स्वीमिंग पूल, हेलिपॅड आहे. या घराची किंमीत दीडशे कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.