Ganesh Chaturthi CAIT Report : आज सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह पाहयला मिळत आहे. दरम्यान, आजची गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) व्यावसायिकांसाठी एक उत्तम पर्वणी असणार आहे. कारण गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. आजच्या दिवशी मोठा व्यवसाय होणार आहे.  CAT च्या अंदाजानुसार, यावर्षी गणेश चतुर्थीला देशभरात सुमारे 25,000 कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.


अहवालत दिलेल्या माहितीनुसार यावेळी देशभरात 20 लाख गणेश मंडळे उभारण्यात आली आहेत. ज्यातून 25000 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा यासारख्या भागात आर्थिक उलाढाल वाढते. या राज्यांमधील स्थानिक व्यावसायिकांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर 20 लाखांहून अधिक गणेश मंडळे उभारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक मंडळावर किमान 50,000 रुपये खर्चाचाही विचार केला, तर हा आकडा 10,000 कोटींहून अधिक होतो.


गणेशमूर्तींचा व्यवसाय 500 कोटीहून अधिक


गणेशमूर्तींचा व्यवसाय 500 कोटी रुपयांहून अधिक आहे. फुले, हार, फळे, नारळ, अगरबत्ती आणि इतर पूजेच्या साहित्याची विक्रीही 500 कोटींच्या जवळपास आहे. मिठाईची दुकाने आणि गृह व्यवसायांची विक्री 2000 कोटींहून अधिक वाढलेली दिसते. याशिवाय, कुटुंबांद्वारे मोठ्या समारंभ आणि मेजवानी आयोजित केल्यामुळे, कॅटरिंग आणि स्नॅक्सवर सुमारे 3000 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.


या वस्तूंची विक्री वाढणार


गणेश चतुर्थीच्या काळात पर्यटन आणि वाहतूक व्यवसायालाही मोठी चालना मिळते. ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल आणि वाहतूक सेवा (जसे की बस, टॅक्सी, ट्रेन) मागणीत वाढ होत आहे. ज्यांची उलाढाल 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. किरकोळ आणि व्यापाराबद्दल बोलायचे तर, सणाशी संबंधित कपडे, दागिने, गृह सजावट आणि भेटवस्तूंची विक्री देखील 3000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण सेवांनाही मोठी चालना मिळते. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही सुमारे 5000 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळेल. त्यामुळं यावर्षी गणेशोत्सवात मोठी उलाढाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल ! 25000 कोटी रुपयांचा व्यवसाय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात जवळपास 20 लाखाहून अधिक गणेश मंडळे आहेत. प्रत्येकाने 50000 रुपयांचा खर्च केला तरी हा व्यवसाय 10000 कोटी रुपयांच्या पुढे जात असल्याचे सांगण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Ganeshotsav : गणरायाचं आगमन सर्वांसाठी आनंद-समृद्धी घेऊन येवो, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन