Amazon and Flipkart: सध्या वेगवेगळ्या सणांना सुरवात झाली आहे. याच कारणामुळे अनेक कंपन्या आपले उत्पादन विकण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणतात. या ऑफर्सअंतर्गत अनेक उत्पादनं ही कमी पैशांत विकली जातात. या काळात इलेक्ट्रॉनिक्स कंन्यांकडूनही आपल्या उत्पादनांवर भरपूर सूट दिली जाते. याच पार्श्वभूमीवर आता ईकॉमर्स प्लेटफॉर्म्स वेगवेगळ्या उत्पादनांवर ऑफर्स वर्षाव करत आहेत. आता ईकॉमर्स सेक्टरच्या (Ecommerce Sector) अॅमोझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या भरघोस ऑफर्स घेऊन आल्या आहेत. आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या पुन्हा एकदा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival) आणि बिग बिलियन डेज (Big Billion Days) घेऊ आल्या आहेत.
अॅमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिव्हल कधी सुरू होणार?
या वर्षी अॅमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिव्हल येत्या 29 सप्टेंबरपासून चालू होत आहे. या काळात 29 ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना वेगवेगळे प्रोडक्ट्स हे कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. या ऑक्टोबर महिन्यात दसरा (Dussehra 2024) आणि दिवाळी (Deepawali 2024) हे महत्त्वाचे सण आहेत. म्हणून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने यावेळी ग्रेड इंडिया फेस्टिव्हल आणि बिग बिलीयन डेज आणले आहेत. अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठ ग्रेट इंडिया फेस्टिव्हल अगोदरच चालू होणार आहे. सोबतच त्यांना स्पेशल ऑफर्स दिल्या जातील.
अॅमेझॉन कोणकोणत्या ऑफर्स देणार?
ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या काळात अॅमेझॉनकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. या काळात ऑपिंगसाठी एसबीआयचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या 10 टक्क्यांची सूट दिली जाईल. तसेच या काळात आयफोनवरही (iPhone) सूट मिळणार आहे. यासह सॅमसंग, ओप्पो, वनप्लस, रियलमी अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवरही भरभक्कम सूट दिली जाईल. सॅमसंग, सोनी आणि एलजी टीव्ही या काळात कमी किमतीत मिळतील.
फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज कधी चालू होणार?
अॅमेझॉनप्रमाणेच फ्लिपकार्टनेही वेगेवगळ्या ऑफर्स आणल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अॅमेझॉनच्या ग्रेड इंडियन फेस्टिव्हलच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 27 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टचे बिग बिलियन डेज सुरु होणार आहेत. फ्लिपकार्टचे हे बिग बिलियन डेज 6 ऑक्टोबरपर्यंत असतील. यातही फ्लिपकार्ट प्लस (Flipkart Plus) आणि व्हीआयपी मेंबर्ससाठी बिग बिलीयन डेज लवकरच चालू होतील.
फ्लिपकार्टचा एचडीएफसीसोबत करार, बम्पर सूट दिली जाणार
फ्लिपकार्टने बिग बिलियन डेजसाटी एचडीएफसी बँकेसोबत (HDFC bank) करार केला आहे. या काळात एचडीएफसी बँकेतर्फे 10 टक्के सूट दिली जाईल. यासह कॅशबॅक, रिवॉर्ड तसेच इतरही ऑफर्स या काळात दिल्या जातील. या काळात होम अप्लायन्सेस, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्यूटी, होम डेकोर, पुस्तके, लहान मुलांच्या वस्तू, स्मार्टफोन आदी वस्तूंवर बम्पर सूट दिली जाईल.
हेही वाचा :
पैसे कमवण्याची पुन्हा मोठी संधी! बड्या कंपनीचा तब्बल 7000 कोटींचा तगडा आयपीओ येणार
15000 चे थेट झाले 25000 रुपये! बजाज फायनान्सनंतर आता पीएन गाडगीळच्या IPO ची हवा