Fixed Deposit Scheme : अनेकजण आपल्याकडील पैशांचे योग्य नियोजन (Proper money planning) करण्यासाठी बँकेत एफडीमध्ये (FD) गुंतवणूक (Investment) करतात. पण काही वेळाला अचानक पैशांची गरज लागते. मग अशावेळी काय करायचं? असा प्रश्न पडतो. पैशांची अचानक गरज लागल्याच FD मोडावी की  एफडीवर कर्ज घ्यावे? या दोन्हीपैकी नेमका कोणता निर्मय घ्यावा, असी द्वीधा अवस्था अनेकांची होते. जर जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


मुदत ठेव योजना ही अजूनही गुंतवणूकदारांची पसंती आहे. तुम्ही FD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. तसेच ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. FD मध्ये ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवले जातात. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी FD मोडली तर बँका तुमच्याकडून दंड आकारतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तोटा सहन करावा लागतो. कारण तुम्ही ज्या दराने FD केली आहे, तेवढाच व्याजदर तुम्हाला मिळत नाही.


पैशांची गरज भासल्यास एफडीवरील कर्जाचा पर्याय निवडू शकता


दरम्यान, एफडीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कधी पैशांची गरज भासली तर ती मोडण्याऐवजी तुम्ही एफडीवर कर्जाचा पर्यायही निवडू शकता. FD तोडणे तुमच्या फायद्याचे कधी आहे आणि FD वर कर्ज घेणे कधी शहाणपणाचे आहे याची गणना तुम्हाला करावी लागेल.


FD मोडल्यास किती नुकसान होणार?


SBI वर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही वेळेपूर्वी FD तोडली तर तुम्हाला FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 1 टक्के कमी व्याज मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 वर्षांची FD केली असेल ज्यावर 6.5 टक्के व्याज दिले जात आहे, परंतु तुम्ही ती दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खंडित केली तर तुम्हाला त्यावर 5.5 टक्के व्याज मिळेल. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागेल. एसबीआयच्या माहितीनुसार, तुम्ही एसबीआयमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची एफडी केल्यास, मॅच्युरिटीपूर्वी ती एफडी तोडल्याबद्दल तुम्हाला 0.50 टक्के दंड भरावा लागेल. तर 5 लाखांपेक्षा जास्त आणि 1 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी केल्यास, मुदतपूर्व ब्रेकसाठी 1 टक्के दंड भरावा लागेल. त्यामुळं तुमचे अधिक नुकसान होते.


FD वर कर्ज घेतल्यावर किती व्याज?


FD वर कर्ज म्हणून तुम्हाला बँकेकडून मिळणारी रक्कम तुमच्या FD च्या रकमेवर अवलंबून असते. साधारणपणे, तुम्हाला एफडी रकमेच्या 90 ते 95 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. तुम्ही FD वर कर्ज घेतल्यास, तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. समजा तुम्ही 5 वर्षांसाठी FD केली आहे आणि त्यावर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला 8 ते 9 टक्के व्याजासह कर्ज मिळेल. FD वर कर्जाचा कालावधी तुमच्या FD च्या कालावधीवर अवलंबून असतो. ज्या एफडीवर तुम्ही कर्ज घेतले आहे त्या एफडीच्या मुदतपूर्तीपूर्वी तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागेल. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नसाल, तर ते कर्ज तुमच्या FD च्या रकमेसह कव्हर केले जाते. तसेच, तुम्ही तुमच्या सोयीनुसार या कर्जाची एकरकमी किंवा हप्त्यात परतफेड करू शकता.


30 ते 40 टक्के रक्कम हवी असेल तर FD वर कर्जाचा पर्याय निवडा


जर तुम्हाला 30, 40 टक्के रक्कम हवी असेल तर तुम्ही FD वर कर्जाचा पर्याय निवडू शकता. यामुळं तुमची बचत होईल आणि तुमची पैशांची गरज देखील पूर्ण होईल. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 1 लाख रुपयांची FD असेल आणि तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयांची गरज असेल, तर तुम्ही FD वर कर्ज घेऊन ही गरज पूर्ण करू शकता आणि कर्जाची परतफेड देखील सहज करू शकता. परंतु जर तुम्हाला FD रकमेच्या 80 ते 90 टक्के रकमेची गरज असेल, म्हणजे 1 लाख रुपयांची FD असेल आणि तुम्हाला 80 ते 90,000 रुपयांची गरज असेल, तर थोडे नुकसान करून तुम्ही FD मध्येच तोडल्यास चांगले होईल.


महत्वाच्या बातम्या:


पैसे बुडण्याची भीती नाही, दमदार रिटर्न्स मिळणार; जाणून घ्या सरकारच्या 'या' चार भन्नाट योजना!