Financial Year End : आर्थिक वर्ष (Financial Year) 2023-24 संपायला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 एप्रिलपासून (1 April) 2024-25 हे नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे.  नवीन वर्ष सुरु होताच आर्थिक नियमांमध्ये काही बदल होतात. दरम्यान, 31 मार्च या दिवशीच आर्थिक वर्ष का संपते? 31 डिसेंबरला का आर्थिक वर्ष संपत नाही? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात याबबतची सविस्तर माहिती. 


देशात 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष असते. हा नियम खूप पूर्वीपासून चालत आला आहे. ब्रिटीश काळात देखील एप्रिल ते मार्च असेच नवीन आर्थिक वर्ष होते. त्यानंतरच्या काळात भारत सरकारनं देखील एप्रिल ते मार्च असेच आर्थिक वर्ष ठेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एप्रिल ते मार्च असेच आर्थिक वर्ष का आहे? याबाबतची माहिती राज्यघटनेत उपलब्ध नाही. हा नियम पूर्वीपासून चालत आल्यानं सरकारनं देखील आर्थिक वर्ष मान्य केलं आहे.


ब्रिटिश काळापासून 1 एप्रिल हे नवीन आर्थिक वर्ष 


1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. मात्र, 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरु होण्याची पद्धत ही ब्रिटीश काळापासून आहे. त्याकाळी 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरु करणं ब्रिटीशांसाठी सोयीचं होत, त्यामुळं त्यांनी अशी सुरुवात केली होती. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यामध्ये रोणताही बदल न करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला. राज्यघटनेमध्ये देखील मार्च ते एप्रिल असेच आर्थिक वर्ष आहे. 


डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्षाचा शेवट न करण्याचं कारण


आर्थिक वर्षाचा शेवट हा 31 मार्च या दिवशी होतो. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली जाते. मात्र, सर्वांच्या मनात एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे आर्थिक वर्ष डिसेंबर महिन्यात का संपत नाही. तर डिसेंबर महिन्यात अनेक सण असतात. यामुळं या काळात सर्वजण व्यस्त असतात. या कारणामुळं डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्षाची सांगता केली जात नाही. 


शेतकरी करतात नवीन पिकांची पेरणी


शेतकऱ्यांच्या दृष्टीकोणातून देखील या नवीन आर्थिक वर्षाला एक वेगळेपण आहे. मार्च महिन्याच्या शेवटापर्यंत शेतकरी सर्व पिकांची कापणी करुन, ही पिकं बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यातून त्यांना उत्पन्न मिळते. त्यानंतर शेतकरी नवीन पीक घेतात. 


हिंदू नववर्षाची सुरुवात


1 एप्रिलपासून नवीन हिंदू वर्षाची सुरुवात केली जाते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळं 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष भारतात सुरु केल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. या काळात लोक नवीन व्यवसायाला सुरुवात करतात. तर काही जण आपल्या कामांची शैली बदलतात. 


महत्वाच्या बातम्या:


NPS ते क्रेडीट कार्ड, 1 एप्रिलपासून आर्थिक नियमांमध्ये नेमका काय बदल होणार?