Public Sector Banks Meeting: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 एप्रिल रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थमंत्री सरकारी योजनांची कामगिरी आणि अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर चर्चा करतील. यासोबतच कर्ज देणाऱ्या संस्थांच्या कामगिरीचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.


अर्थसंकल्पानंतरची पहिली बैठक


2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पीएसबी प्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची ही पहिलीच बैठक असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सरकार बँकांना अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उत्पादक क्षेत्रांना कर्ज वाटप वाढवण्यास सांगू शकते.


ईसीएलजीएसचा घेतला जाईल आढावा 


या बैठकीत विविध सरकारी योजनांची प्रगती आणि विविध आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचा सखोल आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात कर्ज सुविधा हमी योजनेचा (ECLGS) देखील आढावा घेतला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ECLGS मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.


हमी संरक्षण 50,000 पर्यंत वाढले


सरकारने या योजनेंतर्गत दिलेले हमी कवचही 50,000 कोटी रुपयांनी वाढवून 5 लाख कोटी रुपये केले आहे. हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रांनाही या योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.


बँकिंग क्षेत्राचा अजेंडा ठरवला जाईल


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत संपूर्ण वर्षभरासाठी बँकिंग क्षेत्राचा अजेंडा ठरवला जाऊ शकतो. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर 2021 दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेला तोटा झाला नाही. या नऊ महिन्यांत PSB ने 48,874 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.


महत्वाच्या बातम्या


Paisa Jhala Motha : कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स किती महत्वाचा? पाहा काय सांगतात इन्शुरन्स तज्ञ्ज्ञ 


Car Insurance Tips : कार विमा दावा फेटाळला जाऊ नये असं वाटतंय, तर मग 'हे' वाचाच!


विमा पॉलिसीत मोबाईल क्रमांक टाकणे अनिवार्य, अपघातानंतर पोलिसांना करावी लागणार व्हिडिओग्राफी