5 Day Banking: बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा होणार का? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अफवांवर लक्ष देऊ नका असं वक्तव्य निर्मला सीतारामान यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत बोलताना केलं आहे. यामुळं बँक कर्मचाऱ्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीपुर्वी सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाचे दोन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होते. एक म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2022 पासून त्यांचा पगार वाढणार आहे. दुसरे म्हणजे देशातील कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांसाठीही आठवड्यातून 5 दिवस कामकाजाचे या धोरणाला मंजुरी मिळू शकते. दरम्यान, या निर्णयामुळे सरकारी बँकांमधील सुमारे 8 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त रजेचा लाभ मिळणार असल्याचं बोललं जात होते. मात्र, निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय.