ITR File Dates : सध्या अनेकांची आयकर रिर्टन फाइल (Income Tax Return) करण्यासाठी लगबग सुरू  आहे. 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख आहे. तर, यंदाच्या वर्षीदेखील आयकर विभागाकडून शेवटच्या तारखेला मुदत वाढ मिळेल असा अनेकांचा समावेश आहे. मात्र, तुम्ही असा विचार करत असाल तर काहीसं अडचणीत आणू शकते. सरकारकडून यावेळी ITR फाइल करण्यासाठी मुदत वाढवण्याच्या मनस्थितीत नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी म्हटले. त्यांनी आयकर भरणाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचे विवरणपत्र भरण्याचे आवाहन त्यांनी केले.  


महसूल सचिव यांनी मल्होत्रा ​​यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त रिटर्न भरले जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो अधिक असेल अशी आमची अपेक्षा आहे.


मागील वर्षी 31 जुलैपर्यंत जवळपास 5.83 कोटी आयकर रिटर्न दाखल करण्यात आले आहे. असेसमेंट इयर 2022-23 साठीची ही शेवटची तारीख होती. मल्होत्रा यांनी सांगितले की, आयटीआर भरण्याचा वेग यंदा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप वेगवान आहे. त्यामुळे करदात्यांनी दिलेल्या मुदतीत ITR दाखल करा असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या वर्षी मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा करू नये असेही त्यांनी म्हटले. 


33.61 लाख कोटींच्या कर संकलनाचे उद्दिष्ट


मल्होत्रा ​​म्हणाले की, वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) वाढीचा विचार केला तर तो आतापर्यंत 12 टक्के आहे. तर, दर कपातीमुळे उत्पादन शुल्कात कर महसूल वाढीचा दर 12 टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकदा कर दर कपातीचा प्रभाव कमी झाला की, लक्ष्य गाठणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. 


2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पानुसार, चालू आर्थिक वर्षात सरकारला एकूण 33.61 लाख कोटी रुपयांच्या कर प्राप्ती मिळण्याची अपेक्षा आहे.


 9 जुलैपर्यंत 5.17 लाख कोटींची प्रत्यक्ष कर वसुली


प्रत्यक्ष कर वसुलीत यंदा चांगलीच तेजी असल्याचे चित्र आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 जुलै 2023 पर्यंत एकूण कर वसुली 5.17 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या कालावधीच्या तुलनेत 14.65 टक्के अधिक आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. 


अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  प्रत्यक्ष कर संकलनात प्रगती दिसून येत असून आणि 9 जुलैपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 5.17 लाख कोटी रुपये झाले आहे. हे कर संकलन मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 14.65 टक्के अधिक आहे. परतावा वगळता, प्रत्यक्ष कर संकलन एकूण 4.75 लाख कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 15.87 टक्के अधिक आहे. एक तिमाही आणि काही कालावधीसाठी 2023-24 च्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंदाजपत्रकाच्या 26.05 टक्‍के अधिक आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: