Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) नियमित जामीन याचिकेवर आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. यासाठी जॅकलिन कोर्टामध्ये पोहोचली आहे. नुकताच जॅकलिनचा दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाबाहेरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलिन सुनावणीसाठी कोर्टात जाताना दिसत आहे.
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, या प्रकरणी ट्रायल कोर्टाने जॅकलिनला अंतरिम जामीन दिला होता. ईडीने जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जाला विरोध केला आहे.
पिंकी ईराणीही न्यायालयात सुनावणीदरम्यान हजर झाली आहे. पिंकी ईराणीनं जॅकलिन फर्नांडिसची ओळख सुकेश चंद्रशेखरशी करुन दिली होती.
पाहा व्हिडीओ:
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचंनाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले.
सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता.
जॅकलीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तिचा 'रामसेतू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात जॅकलीनसोबत नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: