Exports of India : भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत (Export of Merchandise) जानेवारी 2024 मध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताच्या व्यापारी मालाची निर्यात जानेवारी 2023 मधील 35.80 अब्ज अमेरिकन डॉलर होती. तर जानेवारी 2024 मध्ये ही निर्यात 3.12 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजे ही निर्यात 36.92 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. 


जानेवारी 2024 मध्ये भारताची एकूण निर्यात (व्यापारी आणि सेवा एकत्रित) 69.72 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे. जी जानेवारी 2023 च्या तुलनेत 9.28 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवते. जानेवारी 2024 मध्ये एकूण आयात 70.46 अब्ज अमेरिकन डॉलर असण्याचा अंदाज आहे. जी जानेवारी 2023 च्या तुलनेत 4.15 टक्के सकारात्मक वाढ दर्शवते. एप्रिल-जानेवारी 2023-24 मध्ये भारताची एकूण निर्यात (व्यापारी आणि  सेवा एकत्रित) 638.37 अब्ज अमेरिकन डॉलर असण्याचा अंदाज आहे. जी एप्रिल-जानेवारी 2022-23 च्या तुलनेत (-) 0.19 टक्क्यांनी नकारात्मक वाढ दर्शवते. एप्रिल-जानेवारी 2023-24 मध्ये एकूण आयात 708.79 अब्ज अमेरिकन डॉलर असण्याचा अंदाज आहे. जी एप्रिल-जानेवारी 2022-23 च्या तुलनेत (-) 5.69 टक्क्यांनी नकारात्मक वाढ म्हणजेच घसरण दर्शवते.


जानेवारी 2024 मध्ये व्यापारी मालाची आयात 54.41 अब्ज अमेरिकन डॉलर 


जानेवारी 2023 मधील 35.80 अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये व्यापारी मालाची निर्यात 36.92 अब्ज अमेरिकन डॉलर होती. जानेवारी 2023 मधील 52.83 अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये व्यापारी मालाची आयात 54.41 अब्ज अमेरिकन डॉलर होती. एप्रिल ते जानेवारी 2023-24 या कालावधीत व्यापारी मालाची निर्यात 353.92 अब्ज अमेरिकन डॉलर होती तर एप्रिल-जानेवारी 2022-23 या कालावधीत ती 372.10 अब्ज अमेरिकन डॉलर होती. एप्रिल-जानेवारी 2023-24 या कालावधीसाठी व्यापारी मालाची आयात 561.12 अब्ज अमेरिकन डॉलर होती जी एप्रिल-जानेवारी 2022-23 दरम्यान 601.47 अब्ज अमेरिकन डॉलर होती.


जानेवारी 2024 मध्ये सेवा निर्यातीचे मूल्य 32.80 अब्ज अमेरिकन डॉलरवर


एप्रिल-जानेवारी 2023-24 साठी व्यापारी मालाची वित्तीय तूट 207.20 अब्ज अमेरिकन डॉलर होती जी 2022-23 च्या एप्रिल-जानेवारी मध्ये 229.37 अब्ज अमेरिकन डॉलर होती. जानेवारी 2024 मध्ये पेट्रोलियम आणि रत्ने-आभूषणे वगळता व्यापारी मालाची निर्यात जानेवारी 2023 मधील 25.48 अब्ज अमेरिकन डॉलर च्या तुलनेत 26.12 अब्ज अमेरिकन डॉलर होती. जानेवारी 2024 मध्ये बिगर -पेट्रोलियम, बिगर रत्ने आणि दागिने (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात जानेवारी 2023 मधील 34.51 अब्ज अमेरिकन डॉलर च्या तुलनेत 33.72 अब्ज अमेरिकन डॉलर होती. जानेवारी 2024 साठी सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 32.80 अब्ज अमेरिकन डॉलर आहे, जे जानेवारी 2023 मध्ये 28.00 अब्ज अमेरिकन डॉलर होते. जानेवारी 2024 साठी सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 16.05 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. जे जानेवारी 2023 मध्ये 14.83 अब्ज अमेरिकन डॉलर होते.


महत्वाच्या बातम्या:


भारताच्या कृषी निर्यातीत 10 टक्क्यांनी घट, 'या' वस्तूंच्या निर्यातीत झाली घट