Export in India: जगभरात एकीकडे वाढती महागाई आणि जागतिक मागणी तसेच दुसरीकडे भूराजकीय आव्हानांमुळे  तेढ निर्माण झाल्याचे चित्र असताना भारताची निर्यात वाढल्याचा अंदाज उद्योग व वाणिज मंत्रालयाने वर्तवलाय. भारताची जुलै महिन्यातील निर्यात ही 2.81 टक्क्याने वाढल्याचे सांगण्यात आले असून गेल्यावर्षी याच महिन्यात 60.71 अब्ज होती. ती आता 62.42 अब्ज झाली आहे.  या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात भारताची एकूण निर्यात जवळपास 260 अब्ज डॉलर इतकी झाली होती. यावर्षीचे निर्यात लक्ष 800 अब्ज पर्यंत गाठण्याचा आशावाद सरकारने व्यक्त केला. एप्रिल ते जुलै दरम्यान व्यापारी वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य 144.12 अब्ज डॉलर्स होते.  मागील वर्षीच्या तुलनेत यात 4.15 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. 


जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्सने एप्रिलमध्ये म्हटले आहे की 2024 आणि 2025 मध्ये जागतिक व्यापारात हळूहळू वाढ होईल. 2023 मध्ये ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमती आणि प्रगत अर्थव्यवस्थांमधील चलनवाढ यांच्या दीर्घकाळ परिणामांमुळे मागील चार महिन्यात निर्यात आकुंचन पावली होती. त्यात आता वाढ होत असल्याने दिलासा मिळाल्याचे चित्र आहे..कोणत्या क्षेत्रांमध्ये झालीये वाढ?


नॉन पेट्रोलियम आणि दागिन्यांची निर्यातही वाढली 


देशातील नोन पेट्रोलियम उत्पादनांमध्ये आणि दागिन्यांच्या निर्यातीत मागील वर्षापेक्षा वाढ झाली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांना सांगितलं. मागील वर्षी ही निर्यात 25.47 बिलियन होती. ती आता 26.92 बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. 


इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात 37% ने वाढली 


नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांनंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यात वाढली आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात ही 2023 मधील निर्यातीपेक्षा तब्बल 37.31 टक्क्यांनी वाढली आहे. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यातही 3.66 टक्क्यांनी वाढवून 9.4 बिलियन डॉलर इतकी झाली आहे. 


मांस दुग्ध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीतही वाढ


देशातील मांस, दुग्ध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ही थोडीशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ किरकोळ असली तरी ०.२९ बिलियन डॉलर वरून 0.46 बिलियन डॉलर इतकी झाली आहे.
देशाने 2030 पर्यंत दोन लाख कोटी डॉलरवरून निर्यातन नेण्याचे लक्ष निश्चित केलं होते.


हेही वाचा:


''एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल''; योगी आदित्यनाथ कडाडले


IT इंजिनिअर्संना ऑफर केवळ 2.5 लाखांचं पॅकेज; नेटीझन्सने सीईओ रवि कुमारांचा पगारच काढला


EPFO Claim: PF मधून फक्त 3 दिवसांत 1 लाख रुपये काढणं शक्य, तुम्हाला माहीत हवा केवळ 'हा' नियम