EPFO Rule Change : नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांवर कायमचा तोडगा काढला आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू नये, म्हणून आता ईपीएफओनं अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. ईपीएफओनं वैद्यकीय, शिक्षण, विवाह, घर घेणं किंवा बांधणं अशा कामांसाठीच्या अॅडव्हान्स क्लेमसाठी ऑटो-मोड सेटलमेंटची सुविधा दिली आहे. ज्या पीएफ खातेधारकांचं उत्पन्न 6 कोटींपेक्षा जास्त आहे, ते सर्व या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ही एक अशी सुविधा आहे, जी आपत्कालीन परिस्थितीत पीएफ धारकांना निधी पुरवण्याचं काम करणार आहे.


ईपीएफओच्या या सुविधेसाठी क्लेम करण्यासाठी पूर्वी 15 ते 20 दिवस लागायचे, पण आता हे काम केवळ 3 ते 4 दिवसांत होते. सदस्याची पात्रता, कागदपत्रं, ईपीएफ खात्याची केवायसी स्थिती, बँक खाती इत्यादी तपशील तपासण्यात आल्यानं इतका वेळही लागला. परंतु, आता स्वयंचलित प्रणालीमध्ये ते छाननी आणि मंजुरीसाठी पाठवले जातात, जेणेकरून क्लेम करणं सहज होईल. 


कोण करू शकतं दावा? 


आपत्कालीन परिस्थितीत या निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड एप्रिल 2020 मध्येच सुरू करण्यात आला होता, परंतु त्यावेळी फक्त आजारपणातच पैसे काढता येत होते. आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तुम्ही आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी EPF मधून पैसे काढू शकता. तसेच, जर घरात बहीण आणि भावाचं लग्न झालं असेल तर ते देखील ॲडव्हान्स पैसे काढू शकतात.


किती पैसे काढता येणार? 


आता EPF खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम काढता येणार आहे, तर आधी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. ऑटो सेटलमेंट मोड संगणकाद्वारे आगाऊ निधी काढता येतो. यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही आणि तीन दिवसांत पैसे तुमच्या खात्यावर पाठवले जातील. यासाठी KYC, क्लेम रिक्वेस्टची एलिजिबिलिटी, बँक खात्याचा तपशील देणं आवश्यक आहे.


पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या... 



  • सर्वात आधी UAN आणि पासवर्ड वापरून EPFO ​​पोर्टलवर लॉगिन करा. 

  • आता तुम्हाला ऑनलाईन सेवांवर जाऊन 'क्लेम' सेक्शन निवडावा लागेल. 

  • बँक खातं व्हेरिफाय करा 

  • प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा. 

  • जेव्हा नवं पेज ओपन होईल त्यावेळी पीएफ ॲडव्हान्स फॉर्म 31 निवडावा लागेल. 

  • आता पीएफ अकाउंट सिलेक्‍ट करा.

  • आता तुम्हाला पैसे काढण्याचं कारण, किती पैसे काढायचे आणि पत्ता भरावा लागेल. 

  • त्यानंतर बँकेचा चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला संमती द्यावी लागेल आणि आधार व्हेरिफाय करावं लागेल. 

  • क्‍लेम प्रॉसेसे झाल्यानंतर एम्‍प्‍लॉयरकडे अप्रुवलसाठी जाईल. 

  • ऑनलाईन सर्विसमार्फत तुम्ही क्‍लेम स्‍टेटस चेक करू शकता.