Expensive Residential Locations: देशात श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. श्रीमंती वाढल्यानं देशातील मालमत्तेच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशात अशी ठिकाणं आहेत की, जिथं मालमत्तेच्या किंमती प्रचंड आहेत. करोडपतींना देखील या ठिकाणी राहण्यापूर्वी 10 वेळा नक्कीच विचार करावा लागेल. आज आम्ही तुम्हाला देशातील या महागड्या ठिकाणांबद्दल माहिती सागंणार आहोत. 


भारतातील विविध शहरांमध्ये अनेक महागडी ठिकाणं आहेत. या ठिकाणांची किंमत करोडोंमध्ये आहे. मुंबईतील तारदेवमध्ये येथील मालमत्तेचा सरासरी दर 52 हजार रुपये प्रति फूट इतका आहे. येथे 2 BHK फ्लॅटची किंमत किमान 3 ते 4 कोटींच्या दरम्यान आहे. हे क्षेत्र खूप महाग आहे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे असं म्हटलं जातं. या शहारत जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात आहेत. तर बंगळुरूच्या सदाशिव नगरमध्येही मालमत्ता खूप महाग आहे. येथे राहणारे बहुतांश लोक अब्जाधीश आहेत. सदाशिव नगरमधील मालमत्तेचा सरासरी दर 46 हजार 500 रुपये प्रति फूट इतका आहे. जर तुम्ही इथे 2 बीएचके फ्लॅट खरेदी करायला गेलात तर तुम्हाला तो जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयांना मिळेल.


दिल्लीतही मालमत्तेचे दर गगनाला


दिल्लीतील गोल्फ लिंक्समधील मालमत्तेचे दर गगनाला भिडले आहेत. गोल्फ लिंक्समध्ये सध्याचा दर 1.62 लाख रुपये प्रति चौरस फूट आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील मलबार हिल्स हा देखील अतिशय पॉश परिसर आहे. समुद्राजवळ असलेल्या या भागात दर 75742  रुपये प्रति चौरस फूट आहे. तर सेक्टर 5, चंदीगडमधील मालमत्तेच्या किमती खूप जास्त आहेत. येथील एका व्हिलाची किंमत सुमारे 120 कोटी रुपये आहे. येथील मालमत्तेचे दर सुमारे 29,843 रुपये प्रति चौरस फूट आहेत.


कोलकाताचे न्यू अलीपूर


न्यू अलीपूर, कोलकाता येथे एव्हरेटच्या मालमत्तेचे दर 76,900 रुपये प्रति चौरस फूट आहेत. येथे मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला करोडो रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे, हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये सरासरी मालमत्ता दर 72,000 रुपये प्रति चौरस फूट आहे. येथेही मालमत्तांचे दर कोट्यावधीत आहेत. दरम्यान, देशात सध्या श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, ज्या प्रमाणात श्रीमंती वात आहे,  त्याप्रमाणात देशातील मालमत्तेच्या दरात देखील झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे.  त्यामुळं शहरी भागात सामान्य लोकांना घर घेणं परवड नाही. 


महत्वाच्या बातम्या:


अयोध्येतील जमिनीला 'फुटले पंख, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच दरात झाली एवढी वाढ