Shah Rukh Khan's Deewana Box Office : सिनेक्षेत्रात करियर करण्यासाठी लाखो लोक मुंबईत (Mumbai) संघर्ष करताना दिसतात. मात्र, बोटांवर मोजण्याइतकेच लोक या क्षेत्रात यश मिळवू शकले आहेत. तर याच्या पुढे जाऊन काही कलाकार पदार्पण करतानाच निर्मात्यांना मालामाल करुन ठेवतात. बॉलिवूडमध्ये असाच एक कलाकार आहे, ज्याने पदापर्णातील सिनेमातचं निर्मात्यांना मालामाल केले आणि आज देखील तो बॉलिवूडवर राज्य करतोय. आजही बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये त्याचेचं नाणे चालते. त्याला पाहाण्यासाठी आजही लोक चित्रपटगृहात गर्दी करतात. 


सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा ट्रेंड आहे. दिग्गज कलाकार त्याच्या मुलांना प्रमोट करताना दिसतात. मात्र, सिनेक्षेत्रात कोणतीही पार्श्वभूमी नसताना या अभिनेत्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे आजवरचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, पदार्पणातील सिनेमाच हिट ठरल्याने त्याचा पुढील प्रवास सोपा झाला. जाणून घेऊया..बॉलिवूडचा किंगखान शारुखच्या पदार्पणातील सिनेमाने केलेल्या कमाईबाबत 


किंगखान शारुखच्या पहिलाच सिनेमाने केली होती बक्कळ कमाई 


बॉलिवूडचा स्टार शारुख खानची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. शारुख खानने बॉलिवूडमधील प्रवासाला 1992 मध्ये सुरुवात केली. त्याचा दिवाणा हा पहिला सिनेमा आहे. दिवानाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. सिनेमाने निर्मात्यांना मालामाल केले होते. 


ऋषी कपूर अन् दिव्या भारतीदरम्यान सरस ठरला होता शारुख 


तत्कालीन काळात बॉलिवूडमध्ये ऋषी कपूर यांचे नाव शारुख पेक्षा फार मोठे होते. शारुखची सुरुवात होती. मात्र, तरी देखील शारुखच्या चर्चा दिव्या भारती आणि ऋषी कपूरपेक्षाही जास्त होत्या. शारुख खान या सिनेमात सेकंड लीडमध्ये होता. त्याच्या इंट्रीला देखील चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. 


शारुखच्या एंट्रीनेच जिंकली होती चाहत्यांची मने 


किंगखानचा पहिल्या सिनेमात सेकंड लीड रोल असला तरीही त्याचा अभिनय उत्कृष्ट होता. त्याची एंट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या सिनेमात शारुखने बाईकवरुन धमाकेदार एन्ट्री घेतली होती. या एन्ट्रीनेच चाहत्यांच्या मनात घर केले होते. 


केवळ चार कोटी खर्च करुन बनवला होता दिवाणा


शारुख खान, ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांसारख्या दिग्गज कलाकारांनी दिवाणा या सिनेमात काम केले होते. हा सिनेमा केवळ 4 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आला होता. गुड्डू धनोवा, ललित कपूर आणि राजू कोठारी हे या सिनेमाचे निर्माते होते. तर या सिनेमाचे दिग्दर्शन राज कंवर यांनी केले होते. 


शारुखने आणली होती बाईकची फॅशन 


शारुख खान या सिनेमात एका बाईकवरुन एन्ट्री करताना दिसतो. त्याच्या एन्ट्रीला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळाला की, बाईकवरुन बाहेर फिरण्याची नवी फॅशन रुढ झाली. सिनेमा पाहून अनेक तरुण शारुखच्या या फॅशनला फॉलो करत होते. 


सिनेमाने केली होती तीन पट कमाई 


शारुखच्या या सिनेमाने बंप्पर कमाई केली होती. 4 कोटी खर्च करुन बनलेल्या या सिनेमाने 3 पट कमाई केली होती. 13 कोटींपेक्षाही मोठा गल्ला सिनेमाने कमावला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 18 लाख रुपये कमावले होते. 


धर्मेंद्रमुळे मिळाली होती संधी 


मीडिया रिपोर्ट्नुसार शारुखला दिवाणा सिनेमात धर्मेंद्र यांच्यामुळे संधी मिळाली होती. तेव्हा शारुख दिल आशना है या सिनेमाची शूटींग करत होता. या सिनेमाचे दिग्दर्शन धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी केले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांची भेट शारुखशी झाली आणि त्यांनी निर्मात्यांना शारुखचे नाव सुचवले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Amrita Arora Birthday : चित्रपटात फ्लॉप, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अफेअर, मैत्रीणीच्या पतीसोबत लग्न; कोट्यावधींची मालकीन आहे मलायकाची बहिण!