Jio-Bp And Mahindra & Mahindra Strengthen EV Partnership: देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा आणि जियो-बीपीने भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली ही भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक-एसयूवीज (ई-एसयूव्ही) साठी सर्वात मोठ्या प्रमाणात सुविधा नेटवर्कचा अधिक विस्तार करणार आहे. गेल्या वर्षी दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने आणि सेवा क्षेत्रामध्ये सुविधा निर्माण करण्याचा आपला उद्देश बोलून दाखवला होता आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही कंपन्यांनी ईवी आणि कम्युनिकेशन सॉल्यूशन संचालकांनी एक महत्त्वपूर्ण करार केला आहे.
या कराराच्या अंतर्गत देशभरातील 16 शहरांमध्ये वर्कशॉपमध्ये DC फास्ट चार्जर स्थापित करणार आहे. हे चार्जर सर्वांसाठी खुले असतील. इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित सर्व भागधारकांना या भागीदारीचा फायदा होईल असं Jio-BP, महिंद्रा अँड महिंद्रा डीलरशिप नेटवर्क कराराच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितलं
महिंद्रा आणि महिंद्राची बॉर्डर इलेक्ट्रिक व्हिजन!
या महिन्याच्या सुरुवातीलाने M&M चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅली येथे आपली पहिली सर्व-इलेक्ट्रिक सी सेगमेंट SUV लाँच केली. या e-SUV चे नाव XUV400 आहे. ही गाडी तयार करताना कंपनीने पुढील काही वर्षांत जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या योजनांचे अनावरण करत बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन पूर्ण केले.
दरम्यान आता जो करार करण्यात आलेला आहे त्यामुळेच आता महिंद्रा अँड महिंद्रा समूहाला एसयूव्ही लाँच केल्यामुळे जलद चार्जिंग पायाभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे. M&M ने आपल्या ग्राहकांना सोयीस्कर जलद चार्जिंग नेटवर्क प्रदान करण्याच्या उद्देशानेच Jio-bp सोबत हातमिळवणी केली.
टर्मिनल चार्जिंग स्टेशन्सची स्थापना
देशभरात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करणे हा Jio-bp पल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि ब्रिटिश पेट्रोलियम (bp) यांचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. ही चार्जिंग स्टेशन्स प्रामुख्याने शहरांमध्ये आणि प्रमुख महामार्गांवर असतील, जेणेकरून EV द्वारे शहरात आणि बाहेर प्रवास करणे सोयीचे होईल. एवढेच नाही तर या भागीदारी अंतर्गत एक उत्तम डिजिटल प्लॅटफॉर्मही उपलब्ध करून दिला जात असल्याचं बोललं जातंय.
इलेक्ट्रिक वाहन वापरकर्ते या प्लॅटफॉर्म द्वारे महिंद्रा आणि महिंद्राचे भागीदार चार्जिंग नेटवर्कवर ई-मोबिलिटी सोल्यूशन्स, उपलब्धता, नेव्हिगेशन आणि व्यवहार यासारख्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील.
निव्वळ-शून्य उत्सर्जनाच्या ध्येयावर आधारित जरी हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आलेला असला तरी ही भागीदारी म्हणजे भारतात लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचं कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.