Top Equity Mutual Funds of 2023:  शेअर बाजारासाठी (Share Market) हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे. वर्षभरात, BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी सारख्या प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांनी सतत नवीन आजीवन उच्च पातळी निर्माण केली आहे. आजच्या व्यवहारात निफ्टीने पुन्हा नवीन उच्चांक गाठला आहे. विशेषत: इक्विटीमध्ये गुंतवणूक (investors) करणाऱ्या म्युच्युअल फंडांनाही याचा फायदा झाला आहे. 2023 मध्ये 9 सर्वोत्तम असे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत की, ज्यांनी SIP वर 60 टक्क्यां पेक्षा जास्त परतावा दिला आहे.


इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? 


इक्विटी म्युच्युअल फंड, म्हणजे ते फंड जे त्यांच्या मालमत्ता वाटपामध्ये इक्विटीला जास्तीत जास्त प्राधान्य देतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जे फंड आपली बहुतेक मालमत्ता इक्विटीमध्ये गुंतवतात त्यांना इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतात. यामध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड, मल्टी कॅप म्युच्युअल फंड, ईएलएसएस फंड म्हणजे टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड, कॉन्ट्रा म्युच्युअल फंड, व्हॅल्यू म्युच्युअल फंड, फोकस्ड म्युच्युअल फंड इ.


6 फंडांचा परतावा 60 टक्क्यांपेक्षा जास्त 


शेअर बाजाराच्या ऐतिहासिक रॅलीच्या जोरावर या सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांनी यावर्षी उत्कृष्ट परतावा दिला आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या किमान 6 फंडांनी 2023 मध्ये त्यांच्या SIP गुंतवणूकदारांना किमान 60 टक्के परतावा दिला आहे. साधारणपणे, ज्या गुंतवणूकदारांच्या मनात दीर्घकालीन उद्दिष्टे असतात ते SIP म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजनेअंतर्गत गुंतवणूक करतात.


70 टक्क्यांहून अधिक परतावा


SMF डेटानुसार, या वर्षात आतापर्यंत अर्धा डझन इक्विटी म्युच्युअल फंडांनी त्यांच्या SIP गुंतवणूकदारांना 60-60 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका फंडाने 70 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तो म्हणजे बंधन स्मॉल कॅम्प फंड. यावर्षी SIP गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम इक्विटी फंड कोणते आहेत आणि त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला ते पाहुयात. 


 SIP गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम इक्विटी फंड कोणते ? 


बंधन स्मॉल कॅप फंड: 70.60 टक्के
महिंद्रा मॅन्युलाइफ स्मॉल कॅप फंड: 69.78 टक्के
ITI स्मॉल कॅप फंड: 65.51 टक्के
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड: 63.96 टक्के
फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड: 63.05 टक्के
HSBC मल्टी कॅप फंड: 61.16 टक्के
क्वांट स्मॉल कॅप फंड: 59.49%
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड: 58.54 टक्के
जेएम व्हॅल्यू फंड: 58.44 टक्के


महत्त्वाच्या बातम्या:


Mutual Funds SIP : सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 250 रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये SIP करता येणार