Body Spray Advertisement : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका कंपनीच्या जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत आहे, असं काही लोकांचे मत आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे. या जाहिरातीवर अनेक कलाकारांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. पाहूयात सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...


रिचा चड्ढा 
एखादी जाहिरात शूट करण्याआधी ती क्रिएटिव्ह, स्क्रिप्ट, एजन्सी, क्लायंट, कास्टिंग यांसारख्या अनेक टप्प्यांमधून जाते. प्रत्येकाला बलात्कार हा विनोद वाटतो का?', असं ट्वीट अभिनेत्री रिचा चड्ढानं शेअर केलं आहे.



 


फरहान अख्तर


अभिनेता फरहान अख्तरनं ट्वीटमध्ये 'Shameful' असं लिहित या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. 






सोना मोहपात्रा
गायिका सोना मोहपात्रानं देखील ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'थीम - लैंगिक शोषण. माझ्या twitter टाइमलाइनवर मी ती जाहिरात पाहिली. त्यानंतर मी विचार केला की या जाहिरातीला प्रसिद्धी देणे अधिक वाईट आहे.'






जाहिरात हटवण्याचे आदेश


या जाहिराती रिलीज होताच सोशल मीडियावर गदारोळ माजला. सर्वांनीच यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटशी संबंधित दोन जाहिरातींवरून वाद झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर या दोन्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा:


Body spray advertisement : बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून सुरु झाला वाद, युट्यूब आणि ट्विटरवरून हटवण्यासाठी सरकारचा आदेश!