Egg Price on 11 December 2022: देशभरात थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांसोबतच दक्षिणेकडीला राज्यही थंडीनं व्यापून गेली आहेत. हिवाळ्यात शरीराल ऊब देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. अशा पदार्थांपैकी एक म्हणजे, अंड. थंडींच अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे या दिवसांत अंड्यांचे दरही वाढतात. 


राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार अशा देशांतील अनेक राज्यांमध्ये आता कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये अंड्याची मागणीही वाढते. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या हंगामात त्याच्या मागणीसह, किमतीत वाढही (Egg Price Today) देखील नोंदविली जाते. जाणून घेऊया तुमच्या शहरांत अंड्यांचे दर कमी झाले की, वाढले त्याबाबत सविस्तर... 


मुंबई, पुण्यातील दर काय? 


महाराष्ट्रातही पारा उतरला असून थंडीची हुडहुडी वाढली आहे. त्यासोबतच राज्यातील मुंबई, पुण्यातही थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातही अंड्यांची मागणी वाढली आहे. मुंबईत सध्या अंड्याची प्रति नग किंमत 5.76 रुपये इतकी आहे. तर पुण्यात 5.76 रुपये दरानं एक अंड विकलं जात आहे. अंड्यांची मागणी जास्त वाढली तर दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 


दिल्लीत अंड प्रति नग 5.76  रुपये 


रविवारी म्हणजेच, 11 डिसेंबर 2022 रोजी घाऊक बाजारात अंडी प्रति नग 5.76 रुपये या दरानं विकली जात आहेत. किरकोळ किमतींबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एका अंड्याची किंमत 6.09 रुपये आहे. त्याचबरोबर सुपर मार्केटमध्ये अंड्यांची किंमत 6.27 रुपये प्रति नग विकलं जात आहे. अशा परिस्थितीत आज अंड्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून अंड्याचे दर स्थिर आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच, 7 डिसेंबर रोजी दिल्लीत अंड्याचे भाव बदलले होते. तर दुसरीकडे, जर तुम्ही आज एक डझन अंडी खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला दिल्लीत 69.12 रुपये मोजावे लागतील. 


देशातील मोठ्या शहरांत अंड्याचे प्रति नग दर किती? 



  • मुंबईत अंड्याची किंमत 5.76 रुपये प्रति नग 

  • पुण्यात अंड्याची किंमत 5.60 रुपये प्रति नग 

  • दिल्लीत अंड्याची किंमत 5.76 रुपये प्रति नग 

  • कोलकात्यात अंड्याची किंमत 5.90 रुपये प्रति नग 

  • चेन्नईमध्ये अंड्याची किंमत 5.50 रुपये प्रति नग 


यंदा अंड्याचे भाव वधारले 


1 नोव्हेंबर 2022 रोजी अंड 5.28 प्रति नग विकलं जात होतं. तर अंड्यांचा एक ट्रे 158.4 रुपयांना विकलं जात आहे. दुसरीकडे, 1 डिसेंबरला अंड्यांची किंमत 5.75 प्रति नग इतकी होती. तर एक ट्रे 172.5 रुपयांनी (30 अंडी) विकली जात होती. विशेष म्हणजे, 20 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्लीत अंड्याचा भाव प्रति नग 5.43 रुपये होता. तर, 10 डिसेंबरपर्यंत, त्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. त्यानंतर 5.76 रुपयांना प्रति नग विकलं गेलं. म्हणजेच, 20 दिवसांत एका अंड्याच्या किमतीत 4 रुपयांनी वाढ झाली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच दिल्लीत अंड्याच्या किमतीत वाढ होत आहे, जी आगामी काळातही कायम राहणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dried Fish Rate : सुक्या मासळीचे दर कडाडले, खवय्यांच्या खिशाला झळ बसणार