ED summons to Amazon India Chief :  सक्त वसुली संचलनालयाने (Enforcement Directorate)अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांना समन्स पाठवले आहे. अग्रवाल यांना पुढील आठवड्यात नवी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अमित अग्रवाल यांच्यासह फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांना समन्स बजावण्यात आले आहे. 'फेमा' कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 


अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की 'आम्हाला फ्युचर ग्रुपच्या संदर्भात ईडीने जारी केलेले समन्स मिळाले आहे. आम्हाला नुकतेच समन्स मिळाले आहे. या समन्सला दिलेल्या मुदतीत प्रतिसाद देऊ, असेही कंपनीने म्हटले आहे. 


सन 2019 मध्ये अॅमेझॉनने फ्यूचर कूपनमध्ये काही भागिदारी घेतली होती. या व्यवहारात फेमा कायद्याचे उल्लंघन झाले असावे असे म्हटले जात आहे.  ईडीकडून याचीच चौकशी करण्यात येत आहे. फ्यूचर कूपनची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली होती. कॉर्पोरेट ग्राहकांना भेट कार्ड, लॉयल्टी कार्ड आणि इतर बक्षीस वस्तूंचे विपणन आणि वितरणाचे काम कंपनीकडून केले जात होते. 


या वर्षाच्या सुरुवातीला वाणिज्य मंत्रालयाकडून तपास यंत्रणेला 'आवश्यक कारवाई' करण्याची सूचना देण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायलयाने एका प्रकरणात अमेरिकन कंपनी अॅमेझॉनने फ्यूचर ग्रुपची कंपनीच्या फ्यूचर रिटेलचा अप्रत्यक्षपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फेमा आणि थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन समजले जाईल असे म्हटले जाईल. 


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीमधील सूत्रांनी सांगितले की. या दोन्ही कंपन्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी अॅमेझॉनकडून कंपनीकडून ईडीने दिलेल्या मुदतीत आवश्यक पावले उचलली जातील असे म्हटले गेले आहे. तर, फ्युचर ग्रुपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


दोन्ही कंपन्यांमध्ये फ्यूचर रिटेलच्या संभाव्य विक्रीवरून वाद सुरू आहे. फ्यूचर रिटेलने रिलायन्स रिटेलकडे कंपनीची विक्री करून 2019 मध्ये झालेल्या गुंतवणूक कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा अॅमेझॉनने केला होता.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Gold Price Rise : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची धास्ती, सोन्याच्या दरात तेजी; पुढच्या तिमाहीत 52 हजारांवर पोहोचणार


Upcoming IPO : पुढच्या आठवड्यात 'या' 2 कंपन्यांचे आयपीओ येणार; पैसे गुंतवण्यापूर्वी वाचा काय म्हणतात तज्ज्ञ?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA