मुंबई: दिवाळीसारख्या शुभ मुहूर्तावर देशभर लक्ष्मीपूजन केलं जातं. लोक त्यांचे घर, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी लक्ष्मीची पूजा करतात. जेणेकरून घर, ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणी सुख-समृद्धी कायम राहावी. भारताच्या शेअर बाजारातही ही संस्कृती पाळली जाते. दिवाळीला भारतातील शेअर बाजार (Share Market) बंद राहतो, परंतु दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीपूजन लक्षात घेऊन, बाजार निश्चित वेळेसाठी उघडला जातो. या निश्चित वेळेलाच मुहूर्त ट्रेडिंग (Muhurta Trading 2023) असे नाव देण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्तही शेअर बाजार काही वेळेसाठी सुरू राहणार आहे. 


यंदाची मुहूर्त ट्रेडिंगसाठीचे प्री-ओपन सत्र संध्याकाळी 6:00 ते 6:08 पर्यंत असेल. मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत असेल. त्यामध्ये कॉल ऑक्शन सेशन हे 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत असेल, तर क्लोजिंग सेशन हे 7.15 ते 7.25 अशा वेळेत असेल. 


शेअर बाजाराची सामान्य वेळ


मुहूर्त ट्रेडिंग जाणून घेण्यापूर्वी शेअर बाजारातील सामान्य कामकाज जाणून घ्या. शेअर बाजाराच्या जगात खरेदी-विक्रीला ट्रेडिंग म्हणतात. व्यापारासाठी एक वेळ निश्चित करण्यात आली आहे. समभागांची खरेदी-विक्री आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार केली जाते. उर्वरित दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार बाजार बंद असतो.


सोमवार ते शुक्रवार या दरम्यान बाजार सकाळी 9:00 ते दुपारी 3:30 पर्यंत खुला असतो. बाजाराचे पूर्व सत्र सकाळी 9:00 ते 9:15 पर्यंत खुले असते. यानंतर बाजार सकाळी 9:15 ते दुपारी 3:15 पर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला केला जातो.


मुहूर्ताचा व्यवहार फक्त दिवाळीतच का होतो? (What is Muhurat Trading)


भारतीय शेअर बाजार कोणत्या दिवशी उघडेल आणि कोणत्या दिवशी बंद राहील हे सेबीने (SEBI Securities and Exchange Board of India) आधीच ठरवले आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन तसेच मोठे राष्ट्रीय सणांच्या दिवशी बाजार बंद राहतो. या यादीत दिवाळी सणाचाही समावेश आहे. म्हणजे दिवाळीतही बाजार बंद असतो. मात्र दिवाळी एका शुभ मुहूर्तावर येते. याशिवाय या दिवशी लक्ष्मीपूजन होत असल्याने भारतात उपस्थित गुंतवणूकदारांना या दिवशी शेअर बाजारात व्यवहार करण्याची इच्छा असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त साधण्याची परंपरा आहे.


मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स खरेदी करावेत का?


मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी अनेक नवीन गुंतवणूकदार बाजारात त्यांचा नवीन गुंतवणुकीचा प्रवास सुरू करतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सर्व गुंतवणूकदार केवळ शुभ चिन्ह म्हणून व्यापार करतात असे अनेकदा दिसून येते. एकूणच या दिवशी नफा-तोट्याचा फारसा विचार न करता बरेच लोक आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना पहिल्यांदा शेअर्स खरेदी करायला शिकवतात, मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दिवशी बाजारात खरेदी-विक्री करतात.


याशिवाय डिमॅट खाते आणि ऑप्शन ट्रेडिंग खाते मुहूर्त ट्रेडिंगच्या एकाच दिवशी उघडले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी, इक्विटी ट्रेडिंग व्यतिरिक्त, तुम्ही डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग, MCX ट्रेडिंग, करन्सी ट्रेडिंग देखील करू शकता.


इक्विटी ट्रेडिंग व्यतिरिक्त, सर्व व्यवहारांचे सेटलमेंट मुहूर्त ट्रेडिंगच्या दिलेल्या ट्रेडिंग वेळेत केले जाते. म्हणूनच, जर तुम्हीही पहिल्यांदाच बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते.


काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास?


मुहूर्त ट्रेडिंग साजरा करण्याचा इतिहास प्रथम (BSE Bombay Stock Exchange) मध्ये सापडतो. मुंबई शेअर बाजारात 1957 पासून मुहूर्त ट्रेडिंग पाळला जातो तर राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE National Stock Exchange of India) वर 1992 पासून मुहूर्त ट्रेडिंग साजरा केला जात आहे.


ही बातमी: