Devendra Fadnavis on FDI : महाराष्ट्र राज्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023-24 च्या दुसर्या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) आकडेवारी आली आहे. यामध्ये 28,868 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (Foreign direct investment) आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ) (Devendra Fadnavisयांनी दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता. तर 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली होती.
2023-24 च्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन असं ट्वीट फडणवीसांनी केलं आहे.
विरोधकांचे आरोप, फडणवीसांनी सांगितली थेट आकडेवारी
दरम्यान, महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात पळवले जात आहेत असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने राज्य सरकारवर केला जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेने परदेशी गुंतवणूक सर्वाधिक असल्याचं सांगितलं आहे. हे सांगत असतानाच फडणवीसांनी थेट आकडेवारीच जाहीर केली आहे. 2022-23 या काळात राज्यात 1 लाख 83 हजार 924 कोटींची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याबद्दल फडणवीसांनी सर्वांचं अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: