Demat Account Nominee Deadline:  मार्च महिना शेवटच्या टप्प्यात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस, नवीन आर्थिक वर्ष 2023-24 (FY 2023-24) सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. अशा स्थितीत 31 मार्चपर्यंत अनेक महत्त्वाच्या कामांसाठी शेवटची मुदत आहे.  तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. डिमॅट अकाउंटला (Demat Accounts) नॉमिनी जोडण्यासाठी शेवटची मुदत 31 मार्च 2023 आहे. तुम्ही नॉमिनीची नोंदणी न केल्यास तुमचे डिमॅट खाते गोठवले (Demat Accounts to be Frozen ) जाईल. 


डिमॅट खाते गोठवले जाणार (Demat Accounts to be Frozen)


सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) यापूर्वी 31 मार्च 2022 ही डिमॅट खात्यासाठी नॉमिनी देण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. त्यानंतर ही मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली. सेबीच्या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या डिमॅट खातेधारकाने त्याच्या खात्यात नॉमिनी जोडला नाही, तर त्याचे खाते गोठवले जाणार आहे. डिमॅट खाते गोठवल्यानंतर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवू शकणार नाही. शेअर बाजारातील व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. 


सेबीच्या परिपत्रकानुसार, जुलै 2021 पूर्वी नॉमिनी जोडलेल्या खातेधारकांसाठी नॉमिनी जोडणे ऐच्छिक आहे. जर तुम्ही नॉमिनी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर 31 मार्च पूर्वी नॉमिनीची प्रक्रिया पूर्ण करा. डिमॅट खात्यासाठी नॉमिनी जोडण्याचे काम तुम्ही घरी बसून करू शकता. जाणून घ्या सोपी स्टेप्स...


>> डिमॅट अकाउंटला असे जोडा नॉमिनी


> नॉमिनी जोडण्यासाठी, सर्वप्रथम https://eservices.nsdl.com/instademat-kyc-nomination/#/login या संकेतस्थळाला भेट द्या.


> येथे तुम्हाला डीपी आयडी, क्लायंट आयडी, पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.


> यानंतर, नॉमिनीचे नाव डिमॅट खात्यात जोडावे लागेल.


> नॉमिनीचे नाव कन्फर्म करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर शेवटचा OTP येईल, तो एंटर करा.


> यानंतर तुमच्या नामांकनाची प्रक्रिया पूर्ण होईल.


> एकापेक्षा जास्त नॉमिनी असू शकतात का?


सेबीच्या परिपत्रकानुसार, डिमॅट खात्यात तीन व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून जोडली जाऊ शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडल्यास, तुम्हाला ते गुणोत्तर देखील टाकावे लागेल ज्यामध्ये खात्यात जमा केलेल्या शेअर्सची रक्कम विभागली जाईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :