Sugar Production : यावर्षी देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट झाली आहे. ISMA ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार चालू विपणन वर्ष 2023-24 मध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत देशातील साखर उत्पादन 2.48 टक्क्यांनी घटून 2.236 कोटी टन झालं आहे. वर्षभरापूर्वी याच काळात ते उत्पादन 2.293 कोटी टन होते. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत चालते. औद्योगिक संघटना इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू 2023-24 मार्केटिंग वर्षात साखर उत्पादन 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. यावर्षी देशात साखरेचं उत्पादन हे 3.305 कोटी टन होण्याची शक्यता इस्माने वर्तवली आहे. जे मागील वर्षी 3.662 कोटी टन होते.
'या' प्रमुख राज्यांमध्ये साखर उत्पादनात घट
इस्माच्या मते चालू विपणन वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन कमी राहिले. तथापि, उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन आढाव्याच्या कालावधीत वाढून 67.7 लाख टन झाले जे मागील वर्षी याच कालावधीत 61.2 लाख टन होते.देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन या विपणन वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत घटून 7.94 दशलक्ष टन झाले आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 8.59 दशलक्ष टन होते. त्याचप्रमाणे, देशातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या कर्नाटकातील उत्पादन या कालावधीत 4.6 दशलक्ष टनांवरून घसरून 4.32 दशलक्ष टन झाले आहे. दरम्यान, इस्माने दिलेल्या माहितीनुसार, चालू विपणन वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत देशात सुमारे 505 कारखाने कार्यरत होते. तर वर्षापूर्वीच्या काळात ही संख्या 502 होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 22 कारखान्यांनी कामकाज बंद केल्याची माहिती इस्माने दिली आहे.
कमी पावसाचा ऊस उत्पादनाला मोठा फटका
देशातील काही भागात यंदा कमी पाऊस (Rain) झाला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळ यंदा साखरेच्या उत्पादनात (Sugar production) घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं सध्या साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होताना दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या साखरेची सरासरी किंमत 44.62 रुपये प्रति किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेच साखरेच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील एका वर्षापूर्वी साखरेची किंमत 41.82 रुपये प्रति किलो होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील दोन प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन मर्यादित केले आहे. 2023-24 हंगामात देशांतर्गत वापरासाठी 305 लाख टन नवीन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षी 2022-23 हंगामात 330.90 लाख टन होते.
महत्वाच्या बातम्या: