FD चा 'हा' फंडा वापरला तर पडेल पैशांचा पाऊस, 5 लाखांचे होतील थेट 15 लाख रुपये; जाणून घ्या नेमकी कमाल कशी होणार?
Investment Tips:कोणतीही जोखीम न पत्करता तुम्हाला तुमच्या पैशांवर चांगला परतावा हवा असेल, तर एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. एफडीत पैसे गुंतवून तुम्ही निश्चित व्याजदर मिळवू शकता. मात्र याच एफडीच्या मदतीने तुम्हाला थेट तिप्पट पैसे मिळू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएफडीच्या मदतीने तुम्ही तुमच्या 5 लाख रुपयांचे थेट 15 लाख रुपये करू शकता.
तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेतही एफडी करू शकता. ज्या ठिकाणी चांगले व्याज मिळत आहे, तेथे तुम्ही एफडी करू शकता. आता तुम्ही तुमच्या एफडीची रक्कम तिप्पट कशी करू शकता हे समजून घेऊ या...
तुम्ही एफडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करताय असे गृहीत धरू. पाच वर्षांच्या एफडीवर तुम्हाला 7.5 टक्क्यांनी परतावा मिळतोय, असेही गृहीत धरुया. तुम्हाला या एफडीच्या तिप्पट परातवा हवा असेल तर मात्र मॅच्यूरिटी आल्यानंतर ही एफडी तोडायची नाहीत. म्हणजेच तुम्ही तुमची एफडी एक्स्टेंड करायची आहे.
दोन वेळा तुम्ही तुमची एफडी एक्स्टेंड केल्यास तुम्हाला तुमच्या एफडीपेक्षा तिप्पट रक्कम मिळू शकते. म्हणजेच तुमच्या एफडीचा कालावधी तुम्ही 15 वर्षे केल्यास तुम्हाला तिप्पट परतावा मिळू शकतो.
उदाहरणादखल तुम्ही पाच लाख रुपयांची एफडी पाच वर्षांसाठी कर आहात, असे गृहित धरुया. 7.5 टक्क्यांच्या हिशोबाने पाच वर्षांत तुम्हाला एकूण 7,24,974 रुपये मिळतील. त्यानंतर तुम्ही तुमची एफडी पाच वर्षांसाठी एक्स्टेंड करयाची आहे. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या 5 लाख रुपयांवर पाच वर्षांत तुम्हाला 5,51,175 रुपये व्याज मिळेल.
हीच पाच लाख रुपयांची एफडी आणखी पाच वर्षांसाठी वाढवल्यास तुम्हाला 5 लाखांवर तब्बल 10,24,149 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला 5 लाख रुपये गुंतवून 15 वर्षांत तब्बल 15,24,149 रुपये मिळतील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो