Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2025 फार महत्त्वाचं वर्ष असणार आहे. याचं कारण म्हणजे नवीन वर्षात कर्मफळदाता शनीचं (Shani Dev) राशी परिवर्तन होणार आहे. शनीला (Lord Shani) सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह म्हणतात. शनी तब्बल अडीच वर्षांनी राशी परिवर्तन करतात. त्यामुळे शनीचा शुभ-अशुभ परिणाम हो दिर्घकाळ टिकणारा असतो. सध्या शनी आपली मूळ रास कुंभ राशीत विराजमान आहे. 2025 मध्ये शनीचं राशी परिवर्तन होणार आहे. 


शनीचं हे राशी परिवर्तन मीन राशीत होणार आहे. 2025 च्या 29 मार्च रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशी परिवर्तनाचा अनेक राशींना फायदा तर काही राशींना नुकसान होणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांना नवीन वर्ष 2025 मध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. या राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु होईल. तसेच, या राशी परिवर्तनानंतर तुमच्या खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनावश्यक पैसे खर्च करावे लागू शकतात. तसेच, तुम्ही आरोग्याची काळजी घ्यावी. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांवर नवीन वर्षात 29 मार्चनंतर शनीच्या ढैय्याचा प्रभाव सुरु होईल. या काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतात. तसेच, तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांना नवीन वर्षात सांभाळून राहण्याची गरज आहे. या काळात तुमची ठरवलेली कामे बिघडण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार व्हा. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे रखडू शकतात. तसेच, या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा देखील सामना करावा लागू शकतो. यासाठी पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                     


Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंहसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ