Veg Non veg Thali Cost: शाकाहारी आणि मांसाहारी खाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. दोन्ही जेवणाच्या थाळ्यांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे दरात मोठी घसरण झाली आहे. त्यानंतर शाकाहारी जेवणाची थाळी 17 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.  तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचे दरही कमी झाले आहेत. यामुळं शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


ऑगस्ट आणि जुलै महिन्यात जेवणाच्या थाळीच्या सरासरी दरात मोठी वाढ झाली होती. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे टोमॅटोच्या दरात झालेली वाढ. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात एका थाळीच्या खाद्यपदार्थाच्या सरासरी किंमतीत 17 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. ही 17 टक्के घट शाकाहारी थाळीच्या किंमतीत दिसली असून टोमॅटोचे भाव सामान्य पातळीवर आल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे.


मांसाहारी थाळीचे दरही स्वस्त


मांसाहारी थाळीच्या किंमतीतही सरासरी नऊ टक्क्यांची घट झाली आहे. CRISIL च्या मासिक फूड प्लेट कॉस्ट इंडिकेटरमध्ये हे उघड झाले आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात 12 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या काही महिन्यांतही हे दर आणखी वाढतील असा अंदाज आहे. खरीप 2023 पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव चढे राहू शकतात. सप्टेंबरमध्ये महिन्यात मांसाहारी थाळीत 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. कारण ब्रॉयलर चिकनचे दर मागील महिन्याच्या तुलनेत 2 ते 3 टक्क्यांनी वाढले आहेत. 


इंधनाच्या किंमतीत घट


शाकाहारी जेवणात 14 टक्के आणि मांसाहारी जेवणात 8 टक्के वाटा असणाऱ्या इंधनाच्या किमती सप्टेंबर महिन्यात 18 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली आहे. त्याचा परिणाम जेवणाच्या थाळीच्या किंमतीवर दिसून येत आहे. या महिन्यात हिरवी मिरचीचे भावही 31 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळं जेवणाची थाळी स्वस्त होण्यास मदत झाली आहे.


कसे ठरवले जातात थाळीचे दर


देशातील सर्व प्रदेशातील खाद्यपदार्थांच्या किमतींच्या आधारे, CRISIL घरातील प्लेटची सरासरी किंमत मोजते. त्यामुळे लोकांच्या जेवणाचा खर्च शोधणे सोपे होते. धान्य, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, ब्रॉयलर चिकन आणि स्वयंपाकाच्या गॅसमुळे थाळीच्या किमतीत घट दिसून येत आहे.


विशेष गोष्टी जाणून घ्या


क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स आणि अॅनालिटिक्सच्या फूड प्लेट कॉस्टच्या मासिक निर्देशकामध्ये सप्टेंबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमती कमी झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये टोमॅटोचा दर 62 टक्क्यांची घसरण झाली. 39 रुपये किलोवर टोमॅटोच दर आले. हाच टोमॅटोचा दर ऑगस्टमध्ये 102 रुपये किलोवर होता. व्हेज-नॉन-व्हेज थाळीच्या किमती घसरण्यामागचे मुख्य कारण म्हणजे टोमॅटोच्या किंमतीत झालेली घसरण. अहवालानुसार, वार्षिक आधारावर सप्टेंबरमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत एक टक्का घसरण झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Tomato Price : महागड्या टोमॅटोमुळे शाकाहारी थाळी महागली! किमतीत 28 टक्क्यांची वाढ