Krishnakumar Kunnath Died : सुप्रसिद्ध गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. कॉनर्स्टनंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह इतर भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके अर्थात कृष्णकुमार कुननाथ यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकार आणि संगीतकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार विशाल दादलानी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'हे खरं वाटत नाही. केके तुझ्याशिवाय काहीही सारखं नसेल. काहीच नाही. काहीही नाही. माझं हृदय छिन्न-विछिन्न झालं आहे.'

प्रसिद्ध गायक अरमान मलिकने ट्विट केलं आणि लिहिलं आहे, 'आणखी एक धक्कादायक आणि अतिशय दुःखद घटना. विश्वास बसत नाही की आमचे केके सर राहिले नाहीत... काय होत आहे.'

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विटर करत लिहिलं की, 'केके यांच्या निधनाबद्दल जाणून अतिशय दुःखी झालं आणि धक्का बसला. ओम शांती'

 

 

इतर संबंधित बातम्या