मुंबई : शेअर मार्केटमध्ये गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या तेजीला आज लगाम लागला आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 621 अंकांनी घसरला तर निफ्टी 179 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये एकूण 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो पुन्हा एकदा 60 हजारांच्या आत आला आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्स 59,601.84 अंकावर पोहोचला. निफ्टीमध्येही 179 अंकांची घसरण होऊन तो 17,745.90 वर पोहोचला. तर या घसरणीचा फटका Nifty Bank ला देखील बसला असून त्यामध्ये 0.55 टक्क्यांची म्हणजे 205 अंकांची घसरण होऊन तो 37,490 अंकावर पोहोचला आहे.
आज ऑटो, ऑईल आणि गॅस ही क्षेत्रं सोडली तर सर्व शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये आयटी क्षेत्राचा समावेश आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
IndusInd Bank- 1.96 टक्के
Bajaj Auto- 1.78 टक्के
Bharti Airtel- 1.49 टक्के
Eicher Motors- 1.39 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
JSW Steel- 2.96 टक्के
UltraTechCement- 2.62 टक्के
Tech Mahindra- 2.62 टक्के
Shree Cements- 2.52 टक्के
Reliance- 2.15 टक्के
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
व्याज दरांमध्ये निर्धारित वेळेआधीच वाढ करण्याचे संकेत यूएस फेडने दिले होते. या बातमीचा परिणाम न्यूयॉर्क, टोक्यो आणि आशियायी मार्केटवर झाला आहे. अमेरिकेतील डाऊ, नॅसडॅकमध्ये घसरण झाल्यानंतर त्याचा परिणामा भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे.
कोरोनाने चिंता वाढवली
देशात गेल्या 24 तासात 90 हजारांहून जास्त रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :