मुंबई: या आठवड्यातील सलग दुसऱ्या सत्रात आज शेअर बाजारात घसरण (Closing Bell Share Market Updates) झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 208 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 58 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,626 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये  0.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,642 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्येही आज 194 अंकांची घसरण होऊन तो 43,138 अंकावर बंद झाला. 


आज बाजार बंद होताना एकूण 1565 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1825 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 135 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना BPCL, Tata Steel, Hindalco Industries, Dr Reddy's Laboratories आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीध्ये घसरण झाली. तर  Adani Enterprises, HUL, Bajaj Auto, Nestle India आणि Power Grid Corporation या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


आज मेटल, आयटीच्या इंडेक्समध्ये आज एका टक्क्यापर्यंत घसरण झाली, तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये एका टक्क्यापर्यंत वाढ झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं. 


रुपयामध्ये 82 पैशाची घसरण


डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 82 पैशांची घसरण झाली आहे. सोमवारी रुपयाची किंमत ही 81.79 इतकी होती. आज बाजार बंद होताना रुपयाची किंमत 82.61 वर पोहोचली. 


या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Adani Enterpris- 2.58 टक्के

  • HUL- 1.32 टक्के

  • Bajaj Auto- 0.95 टक्के

  • Nestle- 0.80 टक्के

  • Power Grid Corp- 0.72 टक्के


या शेअर्समध्ये घसरण झाली 



  • BPCL- 2.91 टक्के

  • Tata Steel- 2.50 टक्के

  • Dr Reddys Labs- 2.35 टक्के

  • Hindalco- 2.33 टक्के

  • UPL- 1.86 टक्के


शेअर बाजाराची सुरवात घसरणीने 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 439 अंकाच्या घसरणीसह 62,395.55 खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100.40 अंकांच्या घसरणीसह 18,600.65  खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 329.34 अंकांच्या घसरणीसह 62,505.26 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 94 अंकांच्या घसरणीसह 18,606.15 अंकांवर व्यवहार करत होता.