Stock Market Updates : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील शेअर मार्केटमध्ये काहीशी तेजी दिसून आली. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 193.30 अंकांनी तर निफ्टी 44 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.32 टक्क्यांनी वाढ होऊन तो 60,588.93 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.24 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,047.30 वर पोहोचला आहे. आज 1764 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1468 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 55 शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आजच्या दिवशी मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये दोन टक्क्याहून अधिक घसरण झाल्याचं दिसून आलं आहे तर आयटी, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस तसेच रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून आले आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- HCL Tech- 4.30 टक्के
- Adani Ports- 3.93 टक्के
- HDFC- 1.93 टक्के
- ONGC- 1.67 टक्के
- Divis Labs- 1.15 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- JSW Steel- 4.08 टक्के
- Tata Steel- 3.43 टक्के
- BPCL- 1.53 टक्के
- Hindalco- 1.44 टक्के
- Coal India- 1.28 टक्के
गेले काही दिवस कोरोनाचा वाढता संसर्ग आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. मात्र, नवीन वर्षाचा एक दिवस सोडता शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. या काळात बँका, रिअॅलिटी, तेल आणि वायू आणि आयटी शेअर्समधील नफ्याने हेडलाईन निर्देशांक उंचावले, तरीही मेटल स्क्रिप्समधील तोटा आढळून आला.
संबंधित बातम्या :
- Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार, निफ्टी 18 हजारांवर, आयटी कंपन्यांना 'अच्छे दिन'
- Share Market : Sensex आणि Nifty म्हणजे काय? डिमॅट अकाऊंट कसं काढायचं? जाणून घ्या सर्वकाही
- Share Market : Sensex 650 तर Nifty 190 अंकांनी वधारला; ऑटो, आयटी, बँकांच्या शेअर्समध्ये वाढ