Gold-Silver Rate Update : सोन्या-चांदीच्या दरात आज थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. काल (सोमवारी) जिथे सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून आलेली तिथेच आज या दरांत काही पटींनी वाढ झालेली दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर वाढण्याची शक्यता सांगितली जातेय ज्यामुळे डॉलरचे भावदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सोन्याच्या दरातदेखील वाढ झालेली दिसून आली आहे. 


जाणून घ्या आजचे सोन्याचे दर :
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोघांच्या दरात 0.10 टक्क्यांवरची पातळी दिसून आली आहे. एमसीएक्सवर सोने 48 रूपये किंवा 0.10 टक्केवारीच्या वाढीनंतर 47,503 रूपये प्रति 10 ग्रॅमच्या दरात आहे. तर चांदीच्या बाबतीत एमसीएक्सवर 67 रूपये किंवा 0.11 टक्क्यांच्या वाढीनंतर 60,734 रूपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार सूरू आहे. चांदीची ही किंमत मार्च फ्युचर्ससाठी आहे आणि सोन्याची किंमत फेब्रुवारीच्या फ्युचर्ससाठी आहे.


जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर :
जागतिक बाजारपेठेतसुद्धा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आली आहे. कॉमेक्सवर सोने 6.8 डॉलर किंवा 0.38 टक्क्यांच्या वाढीबरोबर 1805.6 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. तर तेच चांदीच्या दरात 0.08 डॉलर किंवा 0.39 टक्क्यांच्या थोड्या वेगाबरोबर 22.55 डॉलर प्रति औंसचा दर पाहायला मिळतोय. 


घरबसल्या तपासा शहराचा दर :
तुम्ही सोन्याचे दर घरबसल्याही तपासू शकता. इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशननुसार तुम्ही फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत चेक करू शकता. तुम्ही ज्या क्रमांकावर मेसेज कराल त्याच क्रमांकावर तुम्हाला त्दया दिवशाीच्या दराचा मेसेज मिळेल. 


सोनं खरं की खोटं तपासून घ्या :
सोन्याच्या शुद्धतेला तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचादेखील वापर करू शकता. ‘BIS Care app’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. त्याचबरोबर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तक्रारदेखील नोंदवू शकता. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]