मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला आज काहीसा लगाम लागला आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 187.89 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 53.20 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.33 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,808.58 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.31 टक्क्यांची वाढ होऊन तो 53.20 वर पोहोचला आहे. 

आज 1062 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2180 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 83 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, फार्मा, सार्वजनिक बँका ही क्षेत्रं वगळता इतर सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.45 ते 1.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मंगळवारी शेअर बाजारात Tata Steel, Bajaj Finance, Divis Labs, Reliance Industries आणि Bajaj Finserv या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून  ONGC, Power Grid Corporation, IOC, SBI Life Insurance आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.

अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने त्यांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेन्ट कमी होताना दिसत आहे. एफआयआयच्या माध्यमातून परकीय गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचं दिसून येतंय. तसेच रशिया-युक्रेनच्या सीमेवर असलेल्या तणावाचा काहीसा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होत असल्याचं दिसून येतंय.

भारतीय रिझर्व्ह बँकेची एक महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये आर्थिक धोरणासंबंधी महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. गेल्या काही काळापासून आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात कोणतीही वाढ केली नाही. पण आता रिव्हर्स रेपो दरात आरबीआय वाढ करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा परिणामही शेअर मार्केटवर होण्याची शक्यत आहे. 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Tata Steel- 3.09 टक्के
  • Divis Labs- 1.81 टक्के
  • Bajaj Finance- 1.79 टक्के
  • Reliance- 1.68 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • ONGC- 2.99 टक्के
  • Power Grid Corp- 1.68 टक्के
  • IOC- 1.26 टक्के
  • SBI Life Insurance- 1.12 टक्के
  • TATA Cons. Prod- 1.09 टक्के

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha