मोबाईल प्रेमींसाठी आनंदवार्ता आहे. बहुप्रतिक्षित अशी सॅमसंगची नवी स्मार्टफोन सीरीज (samsung smartphone new series) उद्या लॉन्च होणार आहे. दक्षिण कोरियाची (south korea) कंपनी सॅमसंग (samsung company) 9 फेब्रुवारीला आपली नवी स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S22 लाँच करणार आहे. कंपनीच्या 'Galaxy Unpacked' या कार्यक्रमादरम्यान या सीरीजचे अनावरण करण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर. 


Galaxy S22 मालिका लोकप्रिय असलेल्या 'S' स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार असणार आहे.. सॅमसंगने अद्याप लॉन्च होणाऱ्या उपकरणांचे अधिकृत नाव घोषित केलेले नाही, यामध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra यांचा समावेश असू शकतो, असे  Gadgets360 च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.  Samsung चा 'Galaxy Unpacked' इव्हेंट 9 फेब्रुवारीला रात्री 8:30 वाजता होणार आहे. इच्छुक ग्राहक Samsung च्या अधिकृत वेबसाइटवर Samsung Galaxy S22 लॉन्च इव्हेंट लाईव्ह स्ट्रीम करू शकतात.  samsung कंपनीचे अधिकृत यूट्यूब चॅनेल आणि सॅमसंगच्या सोशल मीडिया हँडलवर देखील हा इव्हेंट ऑनलाइन देखील पाहता येईल.


काय फिचर्स असणार?
Gadgets360 ने  दिलेल्या रिपोर्टनुसार,  Samsung Galaxy S22 मालिका स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन मध्ये  8 Gen 1 आणि Exynos 2200 प्रोसेसरसह येण्याची अपेक्षा आहे. शिवाय, 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.कॅमेराच्या बाबतीत, स्मार्टफोनमध्ये 50 MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी S22 मालिका 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज पर्यायामध्ये येण्याची अपेक्षा आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात 3700mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.


Reddit वर नोंदवलेल्या एका युझरच्या म्हणण्यानुसार, Samsung ने Galaxy Unpacked 2022 इव्हेंटचे वेळापत्रक इंस्टाग्रामवर एका जाहिरातीद्वारे दिले आहे. जाहिरातीत Galaxy Unpacked कार्यक्रमासाठी एक लिंक दिलेली आहे. या लिंकद्वारे तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे कळवू शकता,  त्यानंतर सॅमसंगकडून एक पॉप-अप मॅसेज दिला जातो.  ज्यामध्ये सॅमसंगच्या नव्या स्मार्टफोन सीरीजचे लॉन्चींग 9 फेब्रुवारीला सकाळी 10am (भारतीय वेळेनुसार 8:30) होईल, असे वापरकर्त्याने सांगितले.