मुंबई :  शेअर मार्केटमध्ये गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अंशत: वाढ झाल्याचं दिसून आलंय. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 142.81 अंकांनी वधारला तर निफ्टी 66.80 अंकानी वधारला.  मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये एकूण 0.24 टक्क्यांची वाढ होऊन तो  59,744.65 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्येही 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,812.70. वर पोहोचला. आज दिवसभरात एकूण 1910 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात वधारल्या तर 1235 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात घसरल्या. तर 78 शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. 

Grasim Industries, ONGC, Hindalco Industries, HDFC Life आणि Shree Cements या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली तर M&M, Bajaj Finserv, L&T, Bajaj Finance आणि HDFC या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 

आजच्या दिवशी बँक, मेटल, एफएमजीसी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 0.5 ते 0 टक्क्यांची वाढ झाली तर ऑटो, कॅपिटल गूड्स आणि फार्माच्या शेअर्सची जास्त प्रमाणात विक्री झाली. 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Grasim- 4.48 टक्के
  • ONGC- 4.14 टक्के
  • Hindalco- 3.01 टक्के
  • HDFC Life- 2.07 टक्के
  • Shree Cements- 1.95 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • M&M- 1.29 टक्के
  • Bajaj Finserv- 1.28 टक्के
  • Bajaj Finance- 1.15 टक्के
  • Larsen- 1.02 टक्के
  • HDFC- 0.90 टक्के

महत्त्वाच्या बातम्या :