मुंबई: सोमवारी शेअर बाजारात जी वाढ दिसून आली ती आज कायम टिकली नाही. शेअर बाजारात आज काही प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 359 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 76 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,566 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची घसरण होऊन तो - 16,584 अंकावर पोहोचला आहे. 


आज 1720 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1548 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 121 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना उर्जा आणि फायनान्शिअल सेक्टरमध्ये काहीशी विक्री झाल्याची दिसून आलं तर रिअॅलिटी आणि मेटल तसेच ऑटो क्षेत्रामध्ये काहीशी खर.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही जवळपास अर्ध्या टक्क्यांची घसरण झाली आहे. 


रुपयामध्ये घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयामध्ये घसरण झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ही 77.64ल रुपये इतकी आहे.


शेअर बाजाराची सुरुवात
आज शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स 300 अंकांच्या घसरणीसह 55622 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टीत 82 अंकांची घसरण होत 16578 अंकांवर खुला झाला.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • ONGC- 5.00 टक्के

  • M&M- 3.61 टक्के

  • NTPC- 3.38 टक्के

  • Coal India- 3.04 टक्के

  • JSW Steel- 2.30 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Sun Pharma- 3.12 टक्के

  • Kotak Mahindra- 2.96 टक्के

  • HDFC- 2.56 टक्के

  • Titan Company- 1.77 टक्के

  • HDFC Life- 1.63 टक्के


संबंधित बातम्या: