मुंबई : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडने त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ केल्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 337 अंकांची घसरण धाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 88 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,119 अंकांवर पोहोचला तर निफ्टीमध्ये 0.50 अंकांची घसरण होऊन तो 17,629 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही आज 1.39 टक्क्यांची म्हणजे 572 अंकांची घसरण झाली असून तो 40,630 अंकावर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना 1793 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1565 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तर 137 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. बँक इंडेक्समध्येही एक टक्क्याची घसरण झालेली आहे.
आज Titan Company, HUL, Asian Paints, Eicher Motors आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तसेच आज उर्जा, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये काहीशी वाढ झालेली आहे.
रुपयाची 80 पार
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून आज सुरुच असून आज रुपयाच्या किमतीमध्ये 89 पैशांची वाढ झाली आहे. आज रुपयाची किंमत 80.86 इतकी आहे.
फेडच्या व्याजदरात वाढ
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. व्याजदरात वाढ करण्याचे संकेत या आधीच देण्यात आले होते. आता सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेतील महागाई लक्षात घेता येत्या काळातही व्याजदरात वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचा परिणाम आता जगभरातील शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Titan Company- 2.66 टक्के
- HUL- 2.64 टक्के
- Asian Paints- 2.38 टक्के
- Eicher Motors- 1.81 टक्के
- Maruti Suzuki- 1.66 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Power Grid Corp- 3.06 टक्के
- Axis Bank- 2.15 टक्के
- HDFC Bank- 2.13 टक्के
- Coal India- 1.94 टक्के
- HDFC- 1.76 टक्के