मुंबई: शेअर मार्केटमधील गेल्या तीन सत्रापासून सुरू असलेल्या तेजीला आज लगाम लागला आहे.आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 770.31 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 219.80 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.29 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,788.02 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,560.20 वर पोहोचला आहे.
आज 1663 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1602 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 81 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, आयटी, रिअॅलिटी, ऑईल अॅन्ड गॅस यासह इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये 0.9 टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Hero MotoCorp, Bajaj Auto, Divis Labs, Maruti Suzuki आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून HDFC, NTPC, SBI Life Insurance, Grasim Industries आणि Infosys या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
सकाळी पडझड सुरूसकाळी शेअर बाजार सुरू होताच सुरुवातीच्या दोन मिनिटांनंतर सेन्सेक्स 59 हजार 400 च्या खाली घसरला. तर निफ्टी 17 हजार 767 पासून सुरू झाला. बँक निफ्टीमध्येही सकाळी घसरण झाली.100 अंकांनी घसरून बँक निफ्टी 39 हजार 233 वर पोहोचला होता.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Hero Motocorp- 2.93 टक्के
- Bajaj Auto- 2.44 टक्के
- Divis Labs- 1.01 टक्के
- ITC- 0.99 टक्के
- Maruti Suzuki- 0.92 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- HDFC- 3.26 टक्के
- NTPC- 3.19 टक्के
- SBI Life Insurance- 2.86 टक्के
- Infosys- 2.72 टक्के
- Grasim- 2.55 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha