मुंबई: शेअर बाजारातील (Stock Market Updates) कालच्या घसरणीनंतर आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी चांगलाच लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. शेअर बाजारात आज चांगलीच उसळण झाल्याचं दिसून आलं. आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 1564 अंकांची वाढ झाली तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 446 अंकांची उसळण झाली. सेन्सेक्समध्ये आज 2.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,537 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 2.58 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,759 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 1260 अंकांची वाढ होऊन तो 39,536 अंकांवर पोहोचला. 


शेअर बाजारात आज फायनान्शिअल आणि ऑटो सेक्टरच्या इंडेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तर HDFC, ICICI बँक आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली. निफ्टीमधील सर्वच 50 स्टॉकमध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज FMCG च्या स्टॉकमध्ये सर्वाधिक म्हणजे 2.5 ते 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं दिसून आलं.


शुक्रवारी फेडच्या गव्हर्नरांनी व्याजदार वाढविण्याबाबत वक्तव्य केलं होतं. जोवर महागाई आटोक्यात येत नाही तोवर व्याजदर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं फेडचे गव्हर्नर म्हणाले होते. याचा परिणाम अमेरिकेसह जगभरातल्या बाजारपेठांवर झाला होता आणि सोमवारी जागतिक शेअर बाजारात पडझड झाली होती. आजही अमेरिकेच्या शेअर बाजारात निराशा दिसली. परंतु आज आशियाई शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होतं आणि भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे, शिवाय मंदीचीही भारताच चिन्हं नाहीत. यामुळे परदेशी गुंतवणूकदार गेले महिनाभर बाजारात परतलेला दिसून आला. परिणामी मंगळवारी मुंबई शेअर बाजारात रिकव्हरी झाली आणि खरेदीचा जोर कायम राहिला. यापुढेही भारतीय शेअर बाजार तेजीत राहिल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  


आज शेअर बाजारात एकूण 2323 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1007 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 123 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज शेअर बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यामध्ये फायनान्स, ऑटो, रिअॅलिटी आणि उर्जा क्षेत्रातल्या इंडेक्समध्ये चांगली वाढ झाली. तर बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये एक टक्क्यांहून अधिकची वाढ झाली. 


शेअर बाजारात आज सुरुवातीपासून तेजी 


आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287 अंकांनी वधारत 58259 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 101 अंकांनी वधारत 17414 च्या पातळीवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 505 अंकांनी वधारला असून 58,478.03 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीत 165 अंकांची तेजीने 17,478.35 अंकांवर व्यवहार करत होता.


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Bajaj Finserv- 5.44 टक्के

  • Bajaj Finance- 4.91 टक्के

  • IndusInd Bank- 4.56 टक्के

  • Tech Mahindra- 3.92 टक्के

  • Tata Motors- 3.92 टक्के


महत्त्वाच्या बातम्या: