मुंबई: देशभर आज होळीचा उत्साह साजरा केला जात असताना शेअर बाजारातही एक प्रकारे रंगांची उधळण झाल्याचं दिसून आले. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,047 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 311 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.84 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,863.93 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्येही 1.84 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,287 वर पोहोचला आहे. 


आज 2046 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1270 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 127 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरसह सर्वच क्षेत्रांमधील शेअर्सच्या किंमती वाढल्या.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही एक पेक्षा अधिक टक्क्याची वाढ झाली आहे. 


गुरूवारी शेअर बाजारातील HDFC, JSW Steel, Titan Company, SBI Life Insurance and Kotak Mahindra Bank या कंपन्यां टॉप निफ्टी गेनर्स ठरल्या तर Infosys, Cipla, IOC, Coal India आणि HCL Technologies या कंपन्या टॉप निफ्टी लूजर्स आहेत.


रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या सकारात्मक चर्चांमुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. तसेच अमेरीकच्या फेडरल रिझर्व्हकडून 2018 नंतर पहिल्यांदाच व्याजदरात वाढ केल्याने जगभरातील शेअर बाजारात त्याचे परिणाम दिसून येत आहेत.


सुरुवात सकारात्मक
शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 800 अंकांच्या उसळणीसह 57, 620 अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टीतही तेजी दिसून आली. निफ्टी 17,200 अंकांवर खुला झाला. 


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • HDFC- 5.36 टक्के

  • Titan Company- 4.59 टक्के

  • JSW Steel- 4.39 टक्के

  • Reliance- 3.50 टक्के

  • SBI Life Insurance- 3.52 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Infosys- 1.05 टक्के

  • Cipla- 0.86 टक्के

  • IOC-0.49 टक्के

  • HCL Tech- 0.42 टक्के

  • Coal India- 0.14 टक्के


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha