मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 656 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 174 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,098.82 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.96 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,938 वर पोहोचला आहे. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय. 


आज 1432 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1766 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 32 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


मंगळवारी शेअर बाजारात Asian Paints, Shree Cements, Infosys, Grasim Industries आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  ONGC, Tata Motors, SBI, Coal India आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.


अमेरिका व्याजदर वाढीबाबत निर्णय


चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदावल आहे. याचा परिणाम आशियाई बाजारांवर होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत अमेरिका व्याजदर वाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष मागील 2 वर्षांपासून महामारीमुळे स्थिर असलेल्या व्याजदराकडे आहे. 


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • ONGC- 3.91 टक्के

  • Tata Motors- 1.97 टक्के

  • Coal India- 1.93 टक्के

  • SBI- 1.78 टक्के

  • Hindalco- 1.77 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Infosys -2.80 टक्के

  • Shree Cements -2.77 टक्के

  • Asian Paints -2.77 टक्के

  • HUL -2.52 टक्के

  • Grasim -2.47 टक्के


महत्त्वाच्या बातम्या :