मुंबई : सिडकोची बहुप्रतिक्षित योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या 24 तासांतच तब्बल 12,400 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 ऑक्टोबर 2024 रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटासाठी (LIG)च्या या योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचे संकेतस्थळ https:.cidcohomes.com असून नागरिकांना येथे घरांसाठी अर्ज करता येईल.


रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेट्रो स्थानकांच्या जवळ घर 


नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही 67000 घरांची महायोजना साकारली जात असून, या गृहनिर्माण योजनेतील पहिल्या टप्प्यांतील 26000 घरे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत.  


यावेळच्या सिडको घरांच्या सोडतीची वैशिष्ट्ये


अर्जदारांना या सोडतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.


ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल.


या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.


योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.


दरम्यान, सिडको महागृहनिर्माण ही योजना सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न असलेल्या समाजघटांना निश्चित किंमतीत परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेत दोन आर्थिक गट समाविष्ट आहेत.


हेही वाचा :


Mhada Lottery : सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या पुणे अन् कोकण मंडळाचा धमाका, विधानसभेपूर्वीच 18920 घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु 


पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही


Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं