Diwali 2024 Date : भारतीय संस्कृतीत सणाला फार महत्त्व देण्यात आलं आहे. या सणांमध्ये दिवाळी (Diwali 2024) हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा असा सण आहे जो देशभरात साजरा केला जातो. धनत्रयोदशी ते रक्षाबंधन अशा पाच दिवसांच्या या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात. मात्र, यंदा दिवाळी नेमकी कधी याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. यासाठीच यंदाची दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते आपण जाऊन घेऊयात. 


दिवाळी नेमकी कधी? (Diwali 2024 Date)


दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळी साजरी केली जाते. मात्र, यंदा लोकांमध्ये या तारखेसंबंधित संभ्रम आहे. तर, हिंदू कॅलेंडरनुसरा, यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी पासून या सणाला सुरुवात होणार आहे. तर, 3 नोव्हेंबर म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी समापन होणार आहे. 


धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त 


धनत्रयोदशी तिथीची सुरुवात - 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून सुरु होईल. ते त्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत असणार आहे. मात्र, दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजीच सुरु होणार आहे. 


धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत 'या' आहेत तारखा 



  • धनत्रयोदशी - 29 ऑक्टोबर 2024 

  • नरक चतुर्दशी - 31 ऑक्टोबर 2024

  • लक्ष्मी पूजन - 01 नोव्हेंबर 2024 

  • बालिप्रतिपदा, दिवाळी पाडवा - 02 नोव्हेंबर 2024 

  • भाऊबीज - 03 नोव्हेंबर 2024


का साजरी करतात दिवाळी?


दिवाळी या सणाला दीपावली असंही म्हणतात. दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. याचे सांस्कृतिक आणि धार्मिकही महत्त्व आहे. खरंतर, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिलं जातं. 


पौराणिक कथेतील मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करुन ते अयोध्येत परतले होते. 14 वर्षांचा वनवास पूर्ण करुन प्रभू श्रीरामाच्या पुनरागमनाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अयोध्या नगरीतील लोकांनी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली होती. त्यानंतर हा सण देशभरात साजरा करण्यात आला. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology Panchang 17 October 2024 : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; 5 राशींचं भाग्य एका झटक्यात पालटणार, मिळणार दुप्पट लाभ